चटपटीत भरलेली मिरची भजी अशा पध्दतीने बनवा
How to make mirchi bhajiब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चटपटीत भरलेली मिरची भजी अशा पध्दतीने बनवा

पावसाळ्यात आपल्याला सतत भूक लागत असते व काही चांगले स्वादिष्ट पदार्थ खाण्याचे मन करते.

मुंबई : पावसाळा नुकाताच सुरु झाला आहे. पावसाच्या सरी, बेधुंद करणारा मातीचा सुवास, चाय आणि गरमा गरम भजीचा आस्वाद प्रत्येकाला घायचा असतो.

हे देखील पहा -

पावसाळ्यात आपल्याला सतत भूक लागत असते व काही चांगले स्वादिष्ट पदार्थ खाण्याचे मन करते. पावसाळा हा ऋतू भजी आणि पकोड्यांसाठी जास्त ओळखला जातो. बाजारातील पकोड्यांच्या तुलनेत ते घरच्या घरी खूप छान बनवता येतात.कढईत तळल्या जाणाऱ्या पकोड्यांचा सुगंध वेगळाच असतो आणि तो आपल्याला आकर्षित करतो. ही भजी बनवायची कशी ते पाहूया (How to make Mirchi bhaji in marathi)

साहित्य-

स्टफिंगसाठी-

भजीच्या मिरच्या - २०० ग्रॅम (मध्यभागी कापून स्वच्छ करा)

तेल (Oil)- २ छोटे चमचे

चिरलेली हिरवी मिरची - १ छोटा चमचा

उकडून मॅश केलेले बटाटे- १ कप

चवीनुसार मीठ

हळद (Turmeric) पावडर - १/२ छोटा चमचा

लाल तिखट - १/४ छोटा चमचा

गरम मसाला पावडर - १/४ छोटा चमचा

चिरलेली कोथिंबीर - १ छोटा चमचा

How to make mirchi bhaji
साबुदाण्याच्या मदतीने बनवा ही टेस्टी रेसिपी

बेसन पिठ आणि तळण्यासाठी-

बेसन - १ कप

तांदळाचे पीठ - १ छोटा चमचा

चवीनुसार मीठ

तेल - २ चमचे

खायचा सोडा - १/२ छोटा चमचा

शेजवान चटणी - १ छोटा चमचा

आवश्यकतेनुसार पाणी

चाट मसाला - १/२ छोटा चमचा

कृती -

१. सर्वप्रथम तेल गरम करून त्यात हिरवी मिरची थोडी परतून घ्या. त्यात बटाटे, मीठ व वरील मसाले घालून ३-४ मिनिटे शिजवा आणि नंतर कोथिंबीर घालून थंड होऊ द्या.

२. तयार मिश्रण मिरचीमध्ये भरा. बेसनाच्या पीठाचे सारण बनवून त्यात मिरची बुडवा. बेसनाचे कोटिंग तयार होईल.

३. आता कढईत तेल गरम करून ते तळून घ्या आणि दोन्ही बाजूंनी काळजीपूर्वक शिजवा. सोनेरी रंग ​​दिसेपर्यंतच ते तळून घ्या. चाट मसाल्यासोबत सर्व्ह करा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com