Moog Dal Samosa Recipe : सकाळच्या नाश्त्यात बनवा क्रिस्पी मुग डाळ समोसा,जाणून घ्या रेसिपी

बटाटा समोसा आतापर्यंत तुम्ही खाल्लाच असेल मग यावेळेस काहीतरी वेगळं आणि क्रिस्पी म्हणून मुग डाळ समोसा नक्की बनवून पहा.
Moog Dal Samosa Recipe
Moog Dal Samosa RecipeSaam Tv

Moog Dal Samosa Recipe : हिवाळा आणि पावसाळा या दोन ऋतू मध्ये सकाळच्या नाश्त्यात काहीतरी गरम आणि कुरकुरीत खाण्याची इच्छा होते.अशा वेळी झटपट होणाऱ्या रेसिपीच्या शोधात तुम्ही असता.त्यामुळे ही झटपट आणि चवदार अशी रेसिपी ट्राय करा.

बटाटा समोसा आतापर्यंत तुम्ही खाल्लाच असेल मग यावेळेस काहीतरी वेगळं आणि क्रिस्पी म्हणून मुग डाळ समोसा नक्की बनवून पहा. चला तर मग जाणून घेऊया चविष्ट मुग डाळीचा समोसा कसा बनवतात.

Moog Dal Samosa Recipe
Moong Dal Dosa Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी अशाप्रकारे बनवा स्वादिष्ट असा मूग डाळीचा डोसा, पाहा रेसिपी

1. साहित्य

  • २ कप मैदा

  • १ चमचा मीठ

  • २ चमचे तेल (Oil)

  • कनिक मळण्यासाठी पाणी (Water)

2. फिलिंग बनवण्यासाठी

  • ३ टीस्पून लाल तिखट

  • ३ टीस्पून गरम मसाला

  • २ टीस्पून बडीशेप पावडर

  • ३ कप(३-४ तास पाण्यात भिजवून ठेवलेले मूग डाळ)

  • २ टेबलस्पून तेल

  • १ टीस्पून जिरे

  • १/८ टीस्पून हिंग

  • मीठ चवीनुसार

  • २ टिस्पून आमचूर पावडर

Moog Dal Samosa Recipe
Moog Dal Samosa RecipeSaam Tv

3. कृती

  • मूग डाळ समोसे बनवण्यासाठी सर्वप्रथम डाळीला बारीक वाटून घ्या आता दोन चमचे तेल गरम करा.

  • त्यात जिरे हिंग घाला ते तडतड होईपर्यंत तसेच राहू द्या.

  • त्यानंतर त्यात डाळ घाला आणि बाकीचे साहित्य घाला हे मिश्रण मंद आचेवर तळून घ्या पूर्ण शिजल्यानंतर ते त्याला चिकटणार नाही अशी काळजी (Care) घ्या

  • त्यानंतर मिश्रण गॅसवरून काढा आणि थंड होण्यासाठी ठेवा.

  • थर तयार करण्यासाठी प्रथम पिठात मीठ आणि तेल घालून कडक कणीक मळून घ्या आणि पंधरा मिनिटे बाजूला ठेवा.

  • आता पिठाचे छोटे छोटे गोळे करून गोलाकार लाटून अर्धे कापून घ्या.

  • आता त्यातला एक तुकडा घ्या आणि त्याच्या काठावर थोडेसे पाणी लावा शंकूच्या आकारात करून वरचा भाग चांगला दाबा

  • फिलिंग भरल्यानंतर बंद करून घ्या आणि समोसे करण्यापूर्वी तेल पूर्णपणे गरम असावे.

  • समोसे घातल्यानंतर मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com