
Hair Mask : आजकाल केस गळण्याची समस्या सर्व वयोगटातील लोकांना सतावत असते. केस गळणे ही सामान्य गोष्ट आहे पण जास्त केस गळणे आणि रोज गळणे ही एक मोठी समस्या आहे. पण काही घरगुती उपाय करूनही ही समस्या कमी करता येऊ शकते. केस गळती टाळण्यासाठी अनेकजण बाजारात उपलब्ध केमिकलयुक्त उत्तम केसांच्या उत्पादनांचा वापर करतात.
मेथीचे दाणे हे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. आपल्या केसांसाठी देखील गुणकारी असते. मेथीचे दाणे आणि नारळाच्या तेलापासून एक उत्तम पद्धतीचा हेअर मास्क बनवला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला चार ते पाच चमचे मेथीचे दाणे घ्यायचे आहेत. त्यानंतर मेथीचे दाणे कढईमध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत.
त्यानंतर गरम मेथीचे दाणे थंड झाल्यावरती मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्या पावडर मध्ये नारळाचे तेल मिसळवून स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे. ही पेस्ट केसांच्या मुळांना लावून अर्ध्या ते एक तासानंतर केस स्वच्छ पाण्याने धुऊन काढायची आहेत.
मेथीच्या दाण्याची आणि नारळाच्या तेलाची ही पेस्ट तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरू शकते. तुम्हालाही होम रिमेडी बनवण्यास जास्त वेळ देखील लागणार नाही आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल्स सुद्धा नसणार आहेत.
त्यामुळे तुम्ही हा हर्बल मेथीचा हेअर मास्क महिन्यामधून दोन ते तीन वेळा तरी लावला पाहिजे. त्याचबरोबर या हर्बल हेअर मास्कमुळे तुमची केस लांब सडक, चमकदार आणि मजबूत बनतील. त्याचबरोबर या हेअर मास्कमुळे पांढरी केस देखील काळी होण्यास मदत होते. त्याचबरोबर मेथीचे सेवन करणे देखील आपल्या शरीरासाठी चांगले असते.
थंडीमध्ये मेथीचे सेवन करणे हे आपल्या आरोग्यास अत्यंत फायदेशीर ठरते. मेथीमुळे आपल्या शरीरातील जंत मरून जातात. त्याचबरोबर आपले रक्त शुद्ध करण्याचे काम देखील मेथी करते. बरेच लोक थंडीमध्ये मेथीचे लाडू बनवून खातात. मेथीचे लाडू हे अत्यंत पौष्टिक आहारापैकी एक मानले जाते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.