
Homemade Kasuri Methi : कसुरी मेथी प्रत्येक व्यंजनाची चव वाढवण्याचे काम करते. अनेक पौष्टिक तत्त्वांपासून भरपूर असलेले हे सुपरफूड चवीसोबत आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर असते. अनेक प्रकारच्या भाज्यांमध्ये कसुरी मेथीचा वापर केला जातो.
अशातच बाजारामध्ये कसुरी मेथी अगदी सहजरीत्या उपलब्ध होते. परंतु बाजारांमधली मेथी न वापरता घरच्या घरी स्वतःच्या हातांनी कसुरी मेथी बनवून स्टोअर करायची असेल तर, आम्ही सांगितलेल्या टिप्स फॉलो करा.
कसुरी मेथीचा आयुर्वेदिक औषधांमध्ये (Medicine) देखील समावेश असतो. घरामधील एखाद्या कुंडीमध्ये उगवलेली मेथी अँटिऑक्सिडेंट, मिनरल्स, आणि विटामिन्स युक्त असते. औषधी गुणांनी संपन्न असलेली मेथी आणि तिच्या बिया शरीरासाठी अत्यंत फायदेशीर (benefits) असतात. चला तर मग जाणून घेऊया सोप्या पद्धतीने मेथी कशा प्रकारे सुकवली जाते.
जिऱ्याचे बटाटे -
बटाट्याच्या भाजीचे नाव ऐकल्याबरोबर तोंडाला पाणी सुटते. जर तुम्हाला तुमच्या बटाट्याच्या भाजीची चव आणखीन वाढवायची असेल तर तुम्ही भाजीमध्ये कसुरी मेथी टाकायला विसरू नका. खरंतर आपण उघडलेल्या बटाट्यांना बनवण्यासाठी जिरे, कांदा आणि टमाट्याचा तडका लावतो. याशिवाय तुम्ही भाजीमध्ये सुखी मेथी ऍड करू शकता. असं केल्याने तुमची भाजी अतिशय चविष्ट बनेल.
कांद्याचे पराठे -
कांद्याच्या पराठ्यांमध्ये फ्लेवर ऍड करण्यासाठी तुम्ही त्यामध्ये कसुरी मेथीचा वापर करू शकता. केल्याने तुमच्या पराठ्याची चव अतिशय चांगली बनेल. याशिवाय तुम्ही बटाटे, उरलेली डाळ, आणि बेसनच्या पराठ्यांमध्ये देखील कसुरी मेथी ऍड करू शकता.
कढी किंवा ग्रेव्हीमध्ये कसुरी मेथीचा प्रयोग करा -
याशिवाय तुम्ही कधीमध्ये किंवा कोणत्याही ग्रेव्हीवाल्या भाजीमध्ये सुकी मेथी मिक्स करू शकता. सोबतच कढीसाठी बनवलेल्या भज्यांमध्ये तुम्ही कसुरी मेथीचा वापर करू शकता. असं केल्याने तुमच्या पदार्थाची चव आणखीनच वाढेल.
घरच्या घरी कशा पद्धतीने बनवावी कसुरी मेथी -
मेथी चांगल्या प्रकारे धुवून घ्या -
कसुरी मेथी बनवण्यासाठी सर्वात आधी मेथी चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. जर वारंवार धुवून सुद्धा पाण्यामध्ये मातीचे कण दिसत असतील तर, पूर्णपणे व्यवस्थित साफ करा. भाजीमधुन माती पूर्णपणे निघून गेल्यावर स्ट्रेनरवरती पसरवून ठेवा. स्ट्रेनरवरती ठेवल्यामुळे पाणी पूर्णपणे निघून जाते.
मोकळ्या भांड्यामध्ये ठेवा -
मेथी धुवून झाल्यानंतर एखाद्या पसरट भांड्यामध्ये काढून घ्या. असं केल्याने मेथीमध्ये असलेली थोडेफार पाणी आपोआप चुकून जाते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखाद्या जाळीने मेथीला झाकून फास्ट पंख्यावर सुकवू शकता. असं केल्याने तुमची मेथी लवकर ड्राय होऊन जाईल.
मेथीला सुकवा -
अनेक व्यक्ती बिल्डिंगमध्ये राहतात. अशावेळी तुम्ही तुमच्या बालकवीमध्ये एक कपडा अंथरून त्यावर मेथी टाकून पसरवून घ्या. जेणेकरून तुमची मेथी चांगल्या प्रकारे सुकली जाईल. दुसऱ्या दिवशी मेथीला एका मलमलच्या कपड्यामध्ये बांधून काही तासांसाठी उन्हामध्ये ठेवा. तुमच्या घरामध्ये जर ऊन येत नसेल तर, तुम्ही चार ते पाच मिनिटे मेथी मायक्रोवेव्हमध्ये ठेवू शकता. असं केल्याने तुमची मेथी कडक होण्यास मदत.
मेथी कशा पद्धतीने स्टोअर करावी -
मेथीची पाने सुकल्यानंतर रंग बदलतो. मेथी हातात घेतल्याबरोबर दरदरी पीसत असेल तर समजून जा तुमची मेथी स्टोअर करण्यासाठी रेडी आहे. जेव्हा तुमची मेथी पूर्णपणे सुकून जाते तेव्हा तुम्ही त्या मेथीला एअरटाईट कंटेनरमध्ये बंद करून ठेवा. असं केल्याने कसुरी मेथीचा वास आणि चव दोन्हीही बदलत नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.