
How To Make Potatoes Wafer : उन्हाळयात किंवा होळीचा सण जसजसा जवळ येतो तसतसे घरातील महिला वेगवेगळ्या प्रकारच्या पापड, कुरडई बनवायला सुरुवात करतात. यामध्ये बटाट्यांचा सर्वाधिक समावेश केला जातो.
तसेच बटाटयापासून बनवलेल्या पापडांना अधिक प्राधान्य दिले जाते. जेणेकरून हे पापड उपवासाच्या वेळेस खाता येतील. तसेच बटाट्याचे पापड चहा सोबतही खायलाही खूप छान लागतात. त्यामुळे यावेळेस होळीनिमित्त (Holi Festival) पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी तुम्हाला बटाटा पापड बनवायचे असेल तर ही रेसिपी नक्की जाणून घ्या.
1. साहित्य
१ किलो – बटाटे (Potatoes)
2 चमचे – मोहरी
चवीनुसार मीठ
अर्धा टीस्पून मिरची
एक टीस्पून जिरे
2. कृती
बटाटा पापड बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे धुऊन कुकरमध्ये चांगले उकळून घ्या.
यानंतर बटाटे थंड झाल्यानंतर बटाट्या वरची साल काढून बारीक किसून घ्या आता किसलेल्या बटाट्यात मीठ मिरची आणि जिरे घाला त्यानंतर हे मिश्रण हाताला तेल (Oil) लावून कणिक मळल्यासारखे मळून घ्या.
आता हाताला तेलाने ग्रीस करून बटाटासारखे पीठ बनवून प्लेटमध्ये ठेवा अशाप्रकारे सर्व गोळे बनवून प्लेटमध्ये ठेवा.
पापड सुकवण्यासाठी जाड आणि मोठे पारदर्शक पॉलिथिन घ्या आणि पापड सुकवण्यासाठी पॉलिथिन उन्हात एका कापडावर पसरवून त्या भोवती काही जड वस्तू ठेवाव्यात जेणेकरून पॉलिथीन उडून जाणार नाही.
आता एका पोळपाटावर जाड पॉलिथिन ठेवा आणि पॉलिथिनच्या अर्ध्या भागामध्ये बटाट्याचे पीठ ठेवून नंतर दुसरा भागबटाट्याच्या वर ठेवा आणि हलक्या हाताने किंवा रोलिंग पीनने रोल करा.
त्यानंतर गुंडाळलेल्या पापडाच्या वरचे पॉलिथिन शिट व्यवस्थित काढून टाका आणि पापड सुकवलेल्या पॉलिथिन शीट वर फिरवा पापडला लाटताना तेल वापरायला विसरू नका.
असे केल्याने पापड पलटणे सोपे जाते.
पापड कोरड्या पॉलिथिन शीटवर चिकटवा आणि वरून रोल केलेले पॉलिथिन काढून टाका.
असाच प्रकारे सर्व पापड लाटून शीटवर ठेवावेत त्यानंतर पापड साधारण तीन चार तास उन्हात सुकू द्या.
पापड दोन्ही बाजूने व्यवस्थित सुकण्यासाठी त्यांना पलटी करणे गरजेचे असते.
पापड चांगले सुकल्यावर पॉलिथिन मधून सहज काढता येतात.
वाळलेले पापड गोळा करून एका भांड्यात ठेवा आता हे पापड हवं तेव्हा भाजून किंवा तळून खाऊ शकता.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.