Tomato chutney Recipe : अगदी 10 मिनिटांत बनवा टोमॅटोची आंबट-गोड चटणी !

Food : टोमॅटो हा आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतो. अशातच टोमॅटोची भाजी नाही तर चटणी सुद्धा बनवली जाऊ शकते.
Tomato chutney Recipe
Tomato chutney RecipeSaam Tv

Tomato Chutney Benefits : टोमॅटो अनेक भाज्यांमध्ये वापरला जातो. काहीजण टोमॅटोची भाजी देखील अतिशय स्वादिष्ट बनवतात. टोमॅटो हा आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतो. अशातच टोमॅटोची भाजी नाही तर चटणी सुद्धा बनवली जाऊ शकते. जी खाण्यासाठी अत्यंत हेल्दी असते सोबतच टेस्टी सुद्धा असते.

टोमॅटोच्या चटणीची चव तुम्हाला कोणत्याही भाजीची आठवण आणून देणार नाही. टोमॅटोची गोड आंबट चटणी एकदा खाल्ली तर खातच राहाल. अतिशय सोपे आहे फक्त दहा मिनिटांमध्ये ही चटणी तयार केली जाऊ शकते.

Tomato chutney Recipe
Onion Chutney Recipe : 'या' पद्धतीने कांद्याची चटणी बनवा, महिनाभर टिकून राहिल चव!

टोमॅटो चटणीची चव इतकी लाजवाब असते की तुम्ही तुमच्या लहान मुलांना टोमॅटो सॉस ऐवजी ताजी बनवलेली हेल्दी टमाट्याची चटणी देऊ शकता. तुम्हाला टमाट्याची चटणी बनवण्याची पद्धत माहित नसेल तर, आम्ही तुम्हाला झटपट होणाऱ्या टोमॅटोच्या आंबट गोड चटणीची रेसिपी सांगणार आहोत.

टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी लागणारी सामग्री :

  • चार ते पाच टोमॅटो

  • पाच ते सात लसूणच्या पाकळ्या

  • बारीक कापलेली हिरवी मिरची तीन ते चार

  • हिरवी कोथिंबीर दोन टेबलस्पून

  • अद्रक एक टेबलस्पून

  • जिरे अर्धा टी स्पून

  • साखर (Sugar) अर्धा टीस्पून

  • आमचूर पावडर अर्धा टी स्पून

  • तेल (Oil) एक टीस्पून

  • मीठ चवीनुसार

Tomato chutney Recipe
Tomato chutney RecipeCanva

कृती :

  • टोमॅटोची (Tomato) स्वादिष्ट चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. त्यानंतर टोमॅटोचे बारीक बारीक तुकडे करा.

  • त्यानंतर लसूण हिरवी मिरची कोथिंबीर बारीक कापून घ्या. आता एका कढईमध्ये एक टीस्पून तेल टाकून गरम करून घ्या.

  • गरम तेलामध्ये बारीक कापलेला लसूण अद्रक हिरवी मिरची त्याचबरोबर जिरे टाकून काही वेळ परता.

  • जेव्हा मसाला तडकेल तेव्हा त्यामध्ये कापलेले टमाट्याची तुकडे घालून त्यानंतर वरून कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाका.

  • मोठ्या चमचाच्या सहाय्याने सगळी सामग्री परतत रहा.

  • त्यानंतर कढई वरती झाकण ठेवून टमाटे शिजवू द्या. त्यानंतर टमाट्यामध्ये साखर आणि आमचूर पावडर टाकून मिक्स करा आणि थोडा वेळ टोमॅटोची चटणी शिजू द्या. नंतर गॅस बंद करा.

  • जर तुम्हाला गोड चटणी आवडत नसेल तर साखर टाकण्याची काहीही आवश्यकता नाही.

  • चवीला उत्कृष्ट असणारी टोमॅटोची चटणी बनवून तयार आहे.

  • ही चटणी पराठा किंवा रोटी सोबत तुम्ही खाऊ शकता.

  • त्याचबरोबर तुम्ही या टमाट्यांच्या चटणीला दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com