Baby Care: अशा प्रकारे तयार करा मुलांसाठी झटपट हेल्दी स्नॅक्स, आवडीने खातील!

मुलांना नेमका काय पौष्टिक आहार द्यावा हे पालकांना माहित असणे महत्वाचे आहे.
Healthy Foods For Kids
Healthy Foods For KidsSaam Tv

Healthy Foods For Kids: लहान मुलांची शारीरिक क्रिया जास्त असल्याने त्यांना जास्त प्रमाणात भूक लागते. या स्थितीत मुलांना चांगला आहार देणे अति महत्वाचे असते. मात्र अनेक पालक याकडे दुर्लक्ष करतात आणि घरी जे काही उपलब्ध असेल ते मुलांना खाऊ घालतात. पण ही गोष्ट चुकीची आहे.

पालकांनी लहान मुलांना नेहमीच पौष्टिक आहार देण्यावर भर द्यायला हवा. मुलांना नेमका काय पौष्टिक आहार द्यावा हे पालकांना माहित असणे महत्वाचे आहे. यासाठी आज आम्ही तुम्हाला या लेखात काही झटपट तयार होणारे पदार्थ सांगणार आहोत ज्याने मुलांचे आरोग्य उत्तम सुद्धा राहिल.

हे देखील पाहा -

शेंगदाणे व ड्राय फ्रुट्स पावडर

लहान मुलाच्या उत्तम आरोग्यासाठी त्यांना शेंगदाणा पावडर आणि ड्राय फ्रुट्सची पावडर घ्या. सुका मेवा हा अतिशय पौष्टिक मानला जातो. अनेक पालक आपल्या मुलांना सुका मेवा देत नाहीत आणि यामुळे मुलाला हवे असलेले पौष्टिक घटक मिळत नाहीत. ड्राय फ्रुट्स पावडर बनवण्यासाठी तुमचा आवडता सुका मेवा घ्या आणि एक एक करून तव्यावर भाजून घ्या. भाजलेले ड्राय फ्रुट्स ग्राइंडर मध्ये चांगल्या प्रकारे वाटून घ्या.

अ‍ॅप्पल डोनट्स

हा मुलांना आवडणारा पदार्थ आहे. यासाठी एक सफरचंद, थोडीशी ड्राय फ्रुट्स पावडर, पीनट बटर आणि थोड्या सब्जा सीड्सची गरज असते. गोल आकारात सफरचंद कापा. सफरचंदाच्या आतील बिया काढण्यासाठी छोट्या गोल आकाराच्या झाकणाची मदत घ्या. अशा प्रकारे हे डोनटच्या आकाराचे दिसू लागेल. सफरचंदाच्या वर पीनट बटर, ड्राय फ्रुट्स पावडर आणि सब्जा सीड्स लावा आणि अशा प्रकारे तयार आहे तुमचे अ‍ॅप्पल डोनट!

Healthy Foods For Kids
बाब्बो! लातुरात गोगलगायीचा नायनाट करण्यासाठी कोटींचा खर्च

सेवरी टॉपिंग्ज

हा पदार्थ तुमच्या मुलांना नक्की आवडेल आणि त्याला हवे असलेले पोषण देखील यातून मिळेल. यासाठी थोडेसे चिरलेल्या गाजराचे तुकडे, क्रीम चीज, दही आणि चिमुटभर काळीमिरी पावडर घ्या. क्रीम चीज आणि दही एकमेकांत चांगल्या प्रकारे मिसळून घ्या. आता यावर चिमुटभर काळी मिरी टाका. मुलांना स्प्रेड किंवा डीप सारखे गाजर वा इतर भाज्यांसोबत खाऊ घाला.

पावर पॅक्ड सँडविच

हा पदर्थ मुलं चवीने खातात. एक मल्टीग्रेन ब्रेड घेऊन त्यावर तूप लावून ब्रेड चांगल्या भाजून घ्या. आता त्यावर घरच्या घरी बनवलेला स्प्रेड लावा. स्प्रेड बनवण्यासाठी मलई, क्रीम चीज, किसलेले गजर, मीठ आणि चिमुटभर काळी मिरी पावडर घ्या. अशा प्रकारे तुमचा स्प्रेड तयार झाल्यावर त्यावर तेल आणि सब्जा सीड्स घाला. ब्रेड वर योग्य प्रमाणातच हा स्प्रेड लावा आणि मुलांना खायला द्या.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com