
Maruti Suzuki Electric Car : ऑटो एक्सपो 2023 सुरू झाला असून देशातील आघाडीची कार कंपनी मारुती सुझुकीने आपली पहिली इलेक्ट्रिक कार बाजारात आणली आहे. मारुती सुझुकीने आपली इलेक्ट्रिक SUV eVX ही संकल्पना प्रदर्शित केली.
ईव्हीएक्स ही सुझुकीने डिझाइन केलेली आणि विकसित केलेली मध्यम आकाराची इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. या संकल्पनेतील इलेक्ट्रिक SUV मध्ये 60kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे, जो पूर्ण चार्ज झाल्यावर 550 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देईल.
1. फीचर्स :
मारुती बलेनोवर आधारित, याला कर्व्ही एक्सटीरियर्स मिळतात.
त्यात एसयूव्हीचे डिझाइन दिसत आहे. हे एरोडायनामिक सिल्हूट, लांब व्हीलबेस, लहान ओव्हरहॅंग्स आणि उच्च ग्राउंड क्लीयरन्ससह येते. त्याची लांबी 4.3 मीटर आहे.
समोर कोणत्याही प्रकारची ग्रील मिळाली नाही.
हेडलाइट्स आणि डीआरएलचा सेटअप पूर्णपणे एलईडी आहे.
बाजूला ORVM ऐवजी कॅमेरे देण्यात आले आहेत.
दरवाजे उघडण्यासाठी फ्लश डोअर हँडल आहेत. चाकाचा आकारही मोठा आहे.
तसेच, याक्षणी हे एक संकल्पना मॉडेल (Model) आहे, जे उत्पादनात येईपर्यंत बरेच बदल केले जाऊ शकतात. असे देखील म्हटले जात आहे.
मारुती इलेक्ट्रिक SUV eVX चे स्पेसिफिकेशन्स :
परिमाण: 4,300 मिमी लांबी x 1,800 मिमी रुंदी x 1,600 मिमी उंची
प्लॅटफॉर्म: सर्व नवीन समर्पित EV प्लॅटफॉर्म
बॅटरी: 60kWh बॅटरी पॅक, सुरक्षित ड्रायव्हिंग तंत्रज्ञान
ड्रायव्हिंग रेंज: 550 किमी पर्यंत
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.