
What Attracts Married Women To Other Men : नवरा हा सत्यनारायणाच्या प्रसादासारखा असतो असे बरेचदा आपल्याला ऐकायला मिळते. पंरतु, लग्न झाले की, त्याचे चित्र किंबहुना तितके चांगेल किंवा वाईट नसते.
स्त्री घराचे मांगल्य असते तर पुरूष हा घराचे अस्तित्व. या सुखाच्या संसारात नेहमीच गोड गोड असून चालत नाही कधी तरी तिखट किंवा कडू गोष्टी असायला हव्यातच की, नाही तर संसारात कसली मज्जा येते.
लग्न झालेल्या स्त्रियांचे जर त्यांच्या नात्यात (Relationship) शारिरीक आणि मानसिक सुसंवाद असेल, तर कोणतीही स्री आपल्या सुखाचा संसारात खुप छान रमते. नवरा व मुलेबाळे यातचं तिचे आयुष्य ती समजते. तेव्हा परपुरूष कितीही देखणा, रुबाबदार, मनमिळावू असला तरीही ती त्याकडे ती नजर उंचावून पाहात नाही.
कारण तिला स्वत:ला या गोष्टींमध्ये काडीचाही रस नसतो. तिच्या संसारात कितीही ती समाधानी नसली तरी देखील ती आहे तसं स्विकारते. कधीतरी या संसारात नवऱ्याने काही वाईट गोष्टी केल्या, तिला मारझोड केली, तिला समाजात मान नाही दिला अशा बऱ्याच गोष्टींचा ती त्रास सहन न करता ती समाजाविरूध्द वागूही शकत नसते.
मग अशा वेळी लग्न (Marriage) झालेल्या स्त्रिया कधीही परपुरषांकडे पाहत नाही असं देखील होत नाही, समाजाला घाबरुन संयम ठेवण्यापेक्षा मुळात तिच्या मनात या गोष्टींना थाराच नसतो.
तिचा हसता खेळता संसार असावा. ती तिची मुलं, नवरा आणि इतर एकत्रित कुटुंब असावे इतकीच तिची माफक अपेक्षा असते. पण म्हणताता ना, प्रत्येक गोष्टीला अपवाद हा असतोच. बायका लग्न झाल्यावर फक्त कोणाची तरी बायको, सून, वहिनी, आई, नसुन ती आपली मैत्रीणही असते हे बहुधा नवऱ्याच्या लक्षात येत नाही.
प्रत्येक पुरूषाला आपली बायको ही खुपच सुंदर व शरीराने आकर्षक असावी असे वाटते. पण त्याला जर काळीसावळी व बेढब शरीराची बायको भेटली तर तो पुरुष जीवनभर नाखुशच असतो. तीला सतत टोमणे मारत राहातो. तीचा चारचौघात अपमान करायला पण मागेपुढे पाहत नाही.
समोर जर एखादी सुंदर व आकर्षक शरीराची स्त्री आली तर आपल्या पत्नीसमोर तीची स्तुती करतो. विचार करा की, अशा वेळी त्या पत्नीला काय वाटत असेल? तीचा रंग काळासावळा आहे किंवा तीचे शरीर बेढब आहे. ही तिची चूक आहे का ?
पण स्त्रीला मात्र आपला नवरा काळासावळा, बुटका, टक्कल पडलेला किंवा शरीराने बेढब असा मिळाला तरीही ती स्त्री त्या पतीसोबत खुश असते आणी आनंदाने संसार करते. आपल्या पतीचा ती चारचौघात कधीही अपमान करत नाही किंवा होऊ देत नाही. समोर एखादा सुंदर व आकर्षक शरीराचा परपुरूष आला तरी त्या पुरूषाची स्तुती करत नाही.
विवाहीत स्त्रियांच्या स्वत:च्या नवऱ्याविषयी सुद्धा शारिरीक भावना पुरुषांएवढ्या तीव्र नसतात. स्त्री ही भावनाप्रधान आहे. नवऱ्याशी तिचे नाते बऱ्याचदा भावनेने जोडलेलं असते. खरं तर नवऱ्यालाही तिला जिंकायचे असेल तर तिच्या भावना जपाव्या लागतात.
स्त्री नवऱ्याला सुग्रास भोजन आणि शय्यासुख या दोन गोष्टींवर अंकित करून घेऊ शकते. पण स्त्रीयांचे मन पुरुषांपेक्षा सूक्ष्म असते. म्हणून असल्या युक्त्या तिच्यावर चालत नाहीत. बहुतेक विवाहीत स्त्रिया परपुरुषाकडे सरळ नजरेने पाहातात.
कुतूहल म्हणून रंगरूपाकडे पाहतातही! कधी प्रशंसाही करतील. पण तेवढंच! यापुढे जाऊन ओळखी वाढवण्यात त्यांना जराही रस नसतो. विवाहीत स्त्रिसाठी तिचं कुटुंब म्हणजे तिचं नंदनवन असतं.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.