
Family Planning Operation For Male : बाळं जन्माला घालण्यासाठी जितका महत्त्वाचा वाटा स्त्रीचा असतो तितकाचं पुरुषांचा देखील. अनेकदा असे होते की, बाळ जन्माला घालण्यासाठी स्त्रियांच्या शरीरात आवश्यक असणारे शुक्राणू असतात परंतु, पुरुषाच्या शरीरात नसतात. त्यामुळे कुटुंब नियोजन करता येत नाही.
चेंबूरच्या प्रजनन सल्लागार डॉ. स्नेहा साठे म्हणतात की, पती आणि पत्नी दोघांनीही सविस्तर चाचण्या करून घेतल्या पाहिजेत आणि नंतर शल्यक्रिया करण्याआधी तज्ज्ञांशी सविस्तर चर्चा केली पाहिजे. तसेच पुरुषांच्या प्रजननक्षमतेचे मूल्यमापन आणि शल्यचिकित्सा हे वैद्यकशास्त्रामधले सतत विकसित होत राहिलेले क्षेत्र आहे. अलीकडच्या काळात अचूक निदान करून त्यानुसार उपाययोजना (Solution) करणे शक्य झाले आहे.
पुरुषांच्या प्रजननक्षमतेसंबंधी शल्यक्रियांचे पुढील ३ मुख्य प्रकार आहेत
आयसीएसआय प्रक्रियेसाठी शल्यक्रिया करून पुरुषाचे शुक्रजंतू काढणे
शुक्रजंतूंची निर्मिती वाढावी यासाठी केलेली शस्त्रक्रिया
शुक्रजंतूंचा प्रवास व्यवस्थितपणे व्हावा यासाठी केलेली शस्त्रक्रिया
1. आयसीएसआय (ICSI) प्रक्रियेसाठी शल्यक्रिया करून पुरुषाचे शुक्रजंतू काढणे (सर्जिकल स्पर्म रिट्रिव्हल)
ही शल्यक्रिया करून थेट वृषण किंवा अधिवृषण (testes or epididymis) यांमधून शुक्रजंतू मिळविले जातात.
वीर्यामध्ये शुक्रजंतूंची अभाव असेल तर त्या अवस्थेला अझूस्पर्मिया म्हणतात. कधी काही अडथळ्यामुळे शुक्रजंतू वीर्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. तर कधी काही अडथळा नसताना मुळातच वृषाणूंमध्ये शुक्रजंतूंचे उत्पादन होत नसल्यामुळे अझूस्पर्मिया अवस्था निर्माण होते. अडथळ्यामुळे झालेला अझूस्पर्मिया असलेल्या पुरुषांच्या बाबतीत शस्त्रक्रिया करून स्पर्म काढता येतात. अशा पुरुषांना (Men) स्वतःची गुणसूत्रे असलेले अपत्य प्राप्त होऊ शकते. अशा पद्धतीने प्राप्त झालेले शुक्रजंतू पत्नीच्या (Wife) बीजामध्ये खास उपकरणे वापरून प्रविष्ट केली जातात. त्या पद्धतीला intracytoplasmic sperm injection - ICSI असे म्हणतात.
एक सूक्ष्म सुईच्या मदतीने अधिवृषणामधून शुक्रजंतू मिळविण्याच्या पद्धतीला percutaneous epididymal sperm aspiration - PESA असे म्हणतात. ही शस्त्रक्रिया १०-१५ मिनिटात पूर्ण होणारी एक हलकी शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये त्वचेला मोठा छेद द्यावा लागत नाही. PESA शस्त्रक्रियेमध्ये शुक्रजंतू मिळाले नाहीत तर युरॉलॉजिस्ट TESE शस्त्रक्रिया करतात.
Testicular sperm extraction (TESE) या शस्त्रक्रियेमध्ये एक किंवा अधिक वेळा बायॉप्सी करून वृषणामधील काही उती (tissues) बाहेर काढल्या जातात. त्यांमध्ये शुक्रजंतू मिळाले तर ते ताबडतोब वापरावे लागतात. तसे करणे जमणार नसेल नंतर वापरता येतील अशा रीतीने शुक्रजंतू गोठवून ठेवावे लागतात.
2. शुक्रजंतूंची निर्मिती वाढावी यासाठी केलेली शस्त्रक्रिया
वृषणाच्या पिशवीमधील नीला (निळ्या रक्तवाहिन्या) वेड्यावाकड्या होऊन फुगीर झाल्या असतील तर त्या अवस्थेला व्हेरिकोसील म्हणतात.
व्हेरिकोसीलमुळे वृषणाच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊन शुक्रजंतूंचे उत्पादन घटू शकते. जर डॉक्टरांनी व्हेरिकोसीलचे निदान केले असेल तर त्या फुगीर झालेल्या रक्तवाहिन्या काढून टाकाव्या लागतात. पण तसे करण्याआधी काही गोष्टींचा आधी विचार करणे आवश्यक असते. त्यांमध्ये पत्नीचे वय आणि अक्षम प्रजननशक्तीच्या इतर संभाव्य कारणांचा अंतर्भाव आहे. याबाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की याबाबतीत बाह्य तपासणीखेरीज शस्त्रक्रियेसाठी अन्य माहिती (देटा) फारशी उपलब्ध नाही.
३. शुक्रजंतूंचा प्रवास व्यवस्थितपणे व्हावा यासाठी केलेली शस्त्रक्रिया
व्हॅसेक्टोमी म्हणजे नसबंदी -संतती नियमनासाठी केली जाणारी शुक्रजंतूंकंचे निस्सारण रोखणारी एक शस्त्रक्रिया आहे. काही वेळा नसबंदी केलेले पुरुष नसबंदी सोडवू इच्छितात. ते कारण्यासासाठी वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करता येतात. त्यामध्ये शुक्रजंतू वाहिकेची दुरुस्ती हा एक प्रकार आहे.
शुक्रजंतू वाहिकेमधील अडसर असलेला भाग शस्त्रक्रियेने काढून टाकला जातो. त्यामुळे शुक्रजंतूंचा प्रवास पुन्हा पूर्ववत सुरु होऊ शकतो
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.