पुरुषांनी या चुका करु नका, अन्याथा होऊ शकते त्वचेला नुकसान

त्वचेच्या काळजीमध्ये दररोज केलेल्या काही चुका आपल्या त्वचेला खूप नुकसान पोहोचवू शकतात.
Men skin care tips, Skin care tips,
Men skin care tips, Skin care tips,ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : त्वचेची निगा राखण्यासाठी पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया अधिक जबाबदार असतात. काही पुरुषांना पुरुषांना त्वचेच्या काळजीकडे विशेष लक्ष देणे आवडत नाही.

हे देखील पहा -

त्वचेकडे लक्ष न दिल्याने ती कोरडी आणि निस्तेज होऊ लागते. दैनंदिन जीवनशैलीत काही चुका केल्याने त्वचेला (Skin) आणखी नुकसान होऊ शकते. पुरुषांची (Mens) त्वचा ही स्त्रियांच्या तुलनेत अधिक कठीण असते. त्यामुळे पुरुषांच्या त्वचेवर कोणतीही प्रतिक्रिया क्वचितच दिसून येते. परंतु, त्वचेच्या काळजीमध्ये दररोज केलेल्या काही चुका आपल्या त्वचेला खूप नुकसान पोहोचवू शकतात. त्यासाठी काही चुका टाळून पुरुष आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकतात.

१. अधिकतर पुरुष चेहऱ्यासाठी साबणाचा वापर करतात ही जरी सामान्य गोष्ट असली तरी साबण वापरु नये. साबणात असलेल्या रसायनांमुळे व जास्त साबण वापरल्याने त्वचेचे नुकसान होते. त्यामुळे विशेषतः चेहऱ्यावर साबणाऐवजी फेसवॉश वापरणे कधीही चांगले असते.

Men skin care tips, Skin care tips,
World Menstrual Hygiene Day : मासिक पाळी दरम्यान शरीराची स्वच्छता का राखावी ?

२. उन्हाळ्यात त्वचा लवकर कोरडी पडते. अशावेळी आपण मॉइश्चरायझर लावून त्वचेचे नुकसान होण्यापासून वाचवू शकतो. चेहरा धुतल्यानंतर आपण त्वचेनुसार मॉइश्चरायझर लावून त्वचेला कोरडेपणापासून वाचवू शकता.

३. उन्हाळ्यात बहुतेकदा आपण चेहरा चमकदार ठेवण्यात व्यस्त असतो त्यामुळे आपण शरीराच्या इतर अवयवांकडे लक्ष देत नाही विशेषत: पायांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतो. मात्र उन्हाळ्यात घामामुळे पायांची त्वचा लवकर खराब होऊ लागते. त्यामुळे उन्हाळ्यात पाय आणि मोजे स्वच्छ (Clean) ठेवण्याचा प्रयत्न करा.

४. तसेच पुरुषांना त्यांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यासाठी काही सनस्क्रीन आपले काम सोपे करू शकते. घराबाहेर पडण्यापूर्वी त्वचेवर सनस्क्रीन लावून आपण उन्हापासून त्वचेचे संरक्षण करू शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com