मासिक पाळी: श्रीरामपूर गावात 'सखी प्रेरणा' भवनाची निर्मिती, मार्गदर्शनही मिळणार

नंदुरबारमधील श्रीरामपूर गावात सखी प्रेरणा भवनाची निर्मिती केली आहे. यात सॅनिटरी पॅड उपलब्धते सह पॅड विल्हेवाट करण्याच्या मशीनचीही सुविधा देण्यात आली आहे.
मासिक पाळी: श्रीरामपूर गावात 'सखी प्रेरणा' भवनाची निर्मिती, मार्गदर्शनही मिळणार
मासिक पाळी: श्रीरामपूर गावात 'सखी प्रेरणा' भवनाची निर्मिती, मार्गदर्शनही मिळणारदिनू गावित

नंदुरबार: मासिक पाळी दरम्यान महिलांना होणाऱ्या त्रासाचे निवारण गाव पातळीवर देखील व्हावे या उद्देशाने नंदुरबार जिल्ह्यातील श्रीरामपूर या छोट्याशा गावात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर सखी प्रेरणा भवनाची निर्मिती करण्यात आली आहे. याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष एडवोकेट सीमा वळवी यांच्या हस्ते करण्यात आले. (Menstruation: Construction of 'Sakhi Prerna' building in Shrirampur village, guidance will also be given)

हे देखील पहा -

मासिक पाळी सारख्या अतिशय नाजूक व अव्यक्त विषयावर महिलांमध्ये खुलेपणाने चर्चा होणे ही काळाची गरज आहे. याबाबत महिला व किशोरवयीन मुलींमध्ये जनजागृती करण्यासाठी सखी प्रेरणा भवनाची निर्मिती करण्यात आली आहे. सखी प्रेरणा भवन म्हणजे महिलांसाठी एक प्रतिष्ठा खोली आहे. याठिकाणी मासिक पाळी वरील आजारांबाबत निराकरण केले जाणार आहे आहे. तसेच सॅनिटरी पॅड उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर सॅनिटरी पॅड वापरल्यानंतर त्याची विल्हेवाट कशी लावावी याचे मशीन देखील या ठिकाणी बसविण्यात आले आहे. महिला व किशोरवयीन मुलींनी या प्रेरणा भवनाचा नियमित वापर करून इतरांपुढे आदर्श घालून द्यावा, असे आव्हान जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा एडवोकेट सीमा वळवी यांनी केले आहे.

मासिक पाळी: श्रीरामपूर गावात 'सखी प्रेरणा' भवनाची निर्मिती, मार्गदर्शनही मिळणार
धुळ्यात मरणानंतरही मृताला भोगाव्या लागतायत मरण यातना...

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिला व किशोरवयीन मुलींच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक गावात सखी प्रेरणा भवनाची निर्मिती करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती अध्यक्षांनी दिली.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.