
देशातील सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करावे यासाठी सरकार अनेक योजना राबवत असते. यासोबतच सरकार अनेक आकर्षक ऑफर्सही देतात. यावेळी केंद्र सरकारने जीएसटी बिलांची संख्या वाढवण्यासाठी 'मेरा बिल मेरा अधिकार योजना ' सुरू केली आहे. ही योजना 1 सप्टेंबर 2023 पासून सुरू झाली आहे. सरकारने या योजनेद्वारे 1 कोटी रुपयांचे आकर्षक बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. चला, या योजनेची सविस्तर माहिती घेऊया.
अर्थ मंत्रालयाने जाहीर केले आहे की 'मेरा बिल मेरा अधिकार' या योजनेंतर्गत लोकांना 1 कोटी रुपयांचे बक्षीस सोबत इतर अनेक बक्षिसे मिळणार आहेत. सरकार (Government) दर महिन्याला या योजनेत 800 लोकांची निवड करेल. हे 800 लोक असे असतील जे दर महिन्याला त्यांचे GST बिल अपलोड करतील. या 800 लोकांना 10,000 रुपयांचे बक्षीस आहे.
या 800 लोकांव्यतिरिक्त, सरकार 10 लोकांची देखील निवड करेल ज्यांना 10 लाख रुपयांचे बक्षीस दिले जातील. 1 कोटी रुपयांच्या रकमेचा लाभ केवळ 2 लोकांनाच मिळणार आहे. या योजनेचा लाभ फक्त त्या व्यापाऱ्यांनाच मिळेल जे तिमाही आधारावर जीएसटी (Goods And Service Tax) बिले अपलोड करतील.
यासाठी व्यापाऱ्यांना त्यांचे GST बिल हे मेरा बिल मेरा अधिकार या अॅपवर अपलोड (Upload) करावे. या व्यतिरीक्त अधिकृत वेबसाइट web.merabill.gst.gov.in यावर जाऊन GST बिल अपलोड करू शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यापाऱ्यांना किमान 200 रुपयांचे जीएसटी बिल अपलोड करावे लागेल.
अधिकाधिक लोकांना GST बिल घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी सरकारने ही योजना (Scheme) आणली आहे. याशिवाय जीएसटी बिलात वाढ होईल हे देखील कारण आहे. करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी ही योजना खूप प्रभावी ठरेल.
जेणेकरून अधिकाधिक लोकांना GST बिल घेण्यास प्रवृत्त करता येईल. याशिवाय जीएसटी बिलात वाढ हेही कारण आहे. सरकार करबूडवेपणाला आळा घालण्यासाठी ही योजना खूप प्रभावी ठरेल अशी अपेक्षा आहे. याशिवाय या योजनेतून सरकारच्या उत्पन्नातही वाढ होईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मेरा बिल मेरा अधिकार अॅप डाउनलोड करावे लागेल . तुम्हाला अॅप वापरायचे नसेल तर तुम्ही web.merabill.gst.gov.in वर जाऊ शकता.
यानंतर तुम्हाला तुमचे GST बिल अपलोड करावे लागेल. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही किमान 200 रुपयांचे GST बिल अपलोड केले पाहिजे.
या योजनेत वापरकर्ता एका महिन्यात केवळ 25 जीएसटी बिले अपलोड करू शकतो.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला (GSTIN) इनव्हॉइस क्रमांक, बिलाची रक्कम, कराची रक्कम आणि तारीख इत्यादी माहिती भरावी लागेल. याशिवाय या योजनेचा लाभ घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला मेरा बिल मेरा अधिकार अॅपवर त्याचा पॅन क्रमांक, आधार क्रमांक, बँक खात्याची माहिती अपलोड करावी. विजेत्याला ही सर्व माहिती 30 दिवसांच्या आत द्यावी लागेल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.