End of WordPad: मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय; वर्डपॅड होणार बंद, हे आहेत पर्यायी सॉफ्टवेअर

Microsoft WordPad News : युजर्ससाठी मायक्रोसॉफ्टने आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Microsoft WordPad News
Microsoft WordPad News Saam Tv

Microsoft To Shut Down WordPad

तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी म्हणून 'मायक्रोसॉफ्ट' ओळखली जाते. आजकाल प्रत्येकाला टेक्नॉलॉजी सोबत अपडेट रहायचे असते. त्यासाठी मायक्रोसॉफ्ट मदत करते. आजकाल अनेक लोक मायक्रोसॉफ्टवर अवलंबून आहेत. ऑफिसच्या कामासाठी किंवा वैयक्तिक कामासाठी मायक्रोसॉफ्टचा वापर करतात. तर युजर्ससाठी मायक्रोसॉफ्टने आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मायक्रोसॉफ्टने वर्डपॅड (WordPad)बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० वर्षांपासून वर्डपॅड सॉफ्टवेअर विंडोजच्या ऑपरेंटिंग सिस्टीममध्ये आहे. मजकुरावर(Text) काम करताना अनेक ठिकाणी याचा वापर केला जातो.

Microsoft WordPad News
Bank News: पैसे काढण्यासाठी चेक भरताय? या चुका टाळा. अन्यथा...

आतापर्यंत युजर्स याचा वापर मोफत करत होते. परंतु आता मायक्रोसॉफ्टने वर्डपॅड (wordPad)पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. मायक्रोसॉफ्टच्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये विंडोज ९५ (Windows 95)पासून वर्डपॅड उपलब्ध आहे. लोकांचे काम सोपे करण्यासाठी हे सॉफ्टवेअर काम करत आहे.

वर्डपॅड होणार बंद

मायक्रोसॉफ्टने वर्डपॅड बंद करण्याची तयारी सुरू केली आहे. कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये लिहलं आहे की, मोफत असलेले वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर लवकरच विंडोजच्या नवीन अपडेटमध्ये समाविष्ट केले जाणार आहे. परंतु हे अपडेट कधी उपलब्ध होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.

Microsoft WordPad News
Heart Disease Increasing In Youngster : तरुणांमध्ये वाढताय हृदयाच्या समस्या, कशी घ्याल काळजी?

वर्डपॅडला पर्यायी सॉफ्टवेअर

वर्डपॅड बंद होणार असले तरी त्याला पर्यायी सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्टमध्ये उपलब्ध आहेत. युजर्स मायक्रोसॉफ्ट ऑप्शनल फिचर्स कंट्रोल पॅनलवर जाऊन हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करु शकतात. जर तुमच्याकडे वर्डपॅड नसेल तर मायक्रोसॉफ्ट वर्डचा वापर करु शकता. याशिवाय, Libre Office, Zoho Docs, WPS Office, Google Docs आणि थर्ड पार्टी प्रोसेसिंग सॉफ्टवेअरचा वापर करु शकता.

वर्डपॅड बंद झाल्यावर युजर्सवर परिणाम

वर्डपॅड बंद झाल्याने वापरकर्त्यांवर फारसा काही परिणाम होणार नाही. फार कमी लोक त्याचा वापर करतात. अनेक लोक अपडेटेट सॉफ्टवेअरचा वापर करतात. त्यामुळे वर्डपॅड बंद झाल्याने कोणतीही अडचण येणार नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com