
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यासाठी तरुणांनी लवकरच तयारीला लागायला हवे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (MIDC)नोकरीची संधी निर्माण झाली आहे.
एमआयडीसीत ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी पदासाठी नोकरी भरतीची अधिसूचना देण्यात आल्या आहेत. ८०२ पदांसाठी निवड प्रक्रिया राबवण्यात आली आहे. अर्ज कसा कराल जाणून घेऊया सविस्तर
एमआयडीसी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना उमेदवारांना नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर ऑनलाइन लॉग इन करुन आपला अर्ज नोंदवता येईल.
1. अर्ज शुल्क (Price)
अर्ज भरण्यासाठी १ हजार रुपयांची शुल्क ऑनलाइन भरावी लागणार आहे.
मागासवर्गीयसाठी अर्ज शुल्क ९०० रुपये असेल.
2. वयोमर्यादा
उमेदवाराचे वय किमान १८ ते कमाल ४० पर्यंत असायला हवे.
आरक्षित वयोगटासाठी कमाल वयात सुट देण्यात आली आहे.
3. रिक्त पदे
या पदासाठी एकूण ८०२ पदे रिक्त आहेत.
4. अर्जाची शेवटची तारीख
२५ सप्टेंबर, २०२३
अधिक माहितीसाठी एमआयडीसीच्या वेबसाइटला भेट देऊ शकता.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.