Mobile Phone Hacking : सावधान ! Android युजर्स 'या' चुका अजिबात करु नका; पडेल महागात, आयुष्यभराची कमाई जाईल पाण्यात

अनेकांची अवस्था अशी असते की, काही काळ त्यांचा मोबाईल फोन काम करत नसेल तर त्यांची परिस्थिती विचित्र होते.
Mobile Phone Hacking
Mobile Phone HackingSaam Tv

Mobile Phone Hacking : हल्ली मोबाईल फोन वापरणारे वापर करते आपल्याला सर्वत्र पाहायला दिसतात. तो आपल्या जीवनाच्या सगळ्यात महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. स्मार्टफोन ही केवळ फोनच नव्हे तर व्यक्तीची जीवन कुंडली बनली आहे. खाजगी ते सार्वजनिक जीवन आणि त्यातील सर्व आर्थिक घडामोडींची माहिती मोबाईल फोनमध्ये कैद झाली आहे. अनेकांची अवस्था अशी असते की, काही काळ त्यांचा मोबाईल फोन काम करत नसेल तर त्यांची परिस्थिती विचित्र होते.

आपला फोन (Phone) चालत नसेल किंवा त्यात बग आल्यानंतर तो सोडवण्यासाठी आपण अनेक साइट्सचा वापर करतो. सरकारची सायबर सुरक्षा एजन्सी Cert In ने अलीकडेच Android वापरकर्त्यांना SOVA Android Trojan बद्दल चेतावणी दिली. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा व्हायरस यूजर्सचे युजरनेम आणि पासवर्ड सारख्या गोष्टी चोरत आहे. या वर्षी जुलैमध्ये, SOVA अमेरिका, रशिया आणि स्पेन सारख्या देशांमध्ये आपले पाय पसरवत होते, परंतु हळूहळू भारतात देखील या व्हायरस प्रमाण वाढत आहे.

सरकारने अलीकडेच बँकिंग (Bank) वापरकर्त्यांना काही सावधगिरी बाळगण्यासाठी सुरक्षा टिप्स दिल्या आहेत, ज्याचे पालन केल्यास तुम्ही स्वतःला नुकसानापासून वाचवू शकता.

Mobile Phone Hacking
Technology : थांबा ! स्मार्टफोन संपणार का ? बिल गेट्सने सांगितलं येणाऱ्या काळात कसे असेल त्याचे भविष्य !

१. Google Play Store वरुन अॅप्स डाउनलोड करा

कोणतेही नवीन अॅप नेहमी अधिकृत अॅप स्टोअरवरूनच डाउनलोड करा. हे करण्याचा फायदा म्हणजे धोकादायक अॅप्स डाउनलोड होण्याची शक्यता ९० टक्क्यांनी कमी होते. कोणत्याही प्रकारच्या एपीके फाइल्स स्थापित करण्यासाठी सेटिंग्जमध्ये आपल्याला पर्याय विचारला जातो. त्याला सक्षम करु नका. असे केल्याने आपला फोन हॅक होण्याचा धोका अधिक असतो.

२. अॅप डाउनलोड करण्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष द्या

एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे कोणतेही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी प्रथम अॅपशी संबंधित तपशील वाचा जसे की, किती लोकांनी अॅप डाउनलोड केले आहे, लोकांच्या अॅपबद्दल पुनरावलोकने काय आहेत. त्याला किती स्टार्स मिळाले आहेत. याची योग्य तपासणी करा.

३. क्लिक करण्यापूर्वी हे करा

ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, तुम्हाला मेसेज, ईमेल किंवा गुगलवर कोणत्याही प्रकारची URL मिळाली तर क्लिक करण्याची चूक करू नका. फक्त वेबसाइट डोमेन स्पष्टपणे दर्शवणाऱ्या URL वर क्लिक करा. जर तुम्हाला URL बद्दल काही शंका असेल तर तुम्ही Google वर जाऊन थेट त्या कंपनीच्या साइटवर जाऊन त्यांच्या URL आणि तुम्हाला मिळालेल्या URL ची लिंक एकच आहे की नाही ते तपासा.

Mobile Phone Hacking
Google Chrome Hacking : सावधान ! Google Chrome चा वापर करतायं ? हॅक होऊ शकतो तुमचा पर्सनल डेटा

४. बँक खात्याचा जपून वापर करा

बऱ्याचदा आपण पैसे काढण्यासाठी किंवा फोन पे, गुगल पे सारख्या अॅप्सचा वापर करतो त्यामुळे आपला सर्व बॅक डिटेल्स समोरच्या वापरकर्त्याकडे जाते. बँकेत खाते असल्यास आणि तुमच्या खात्यात असा कोणताही व्यवहार आढळल्यास, जो तुम्ही केला नाही किंवा तुमच्या खात्यातून पैसे काढल्याचा कोणताही संदेश जर तुम्हाला आल्यास अशा परिस्थितीत ताबडतोब बँकेला कळवा. ज्यामुळे पुढे होणारा त्रास काही प्रमाणात कमी होईल.

५. अॅप परमिशन देताना लक्ष ठेवा

अॅप डाऊनलोड केल्यानंतर आपल्या फोनमध्ये अनेक प्रकारच्या परवानग्या मागत असेल तर, अॅप चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या अॅप्सनाच परवानग्या द्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com