
भारत देशाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. भारताने हा वारसा जपला आहे. हा वारसा कला, साधने, वास्तू या सगळयातून जगाला कळत आहे. हाच वारसा मुंबई शहराला लाभला आहे. मुंबई शहरातील अनेक जुन्या इमारतींना काही न काही इतिहास आहे. या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी बुकिंगची आवश्यकता असते.
मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशा अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी देश विदेशातून पर्यटक येतात . यातीलच एक ठिकाण म्हणजे राजभवन. राजभवन ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. या वास्तूला भेट देण्यासाठी बुकींग करावे लागते. हे बुकिंग तुम्ही कसे करु शकता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
राजभवन ही ब्रिटिंशाच्या काळात बांधली गेलेली वास्तू आहे. राजभवनाला 'ब्रिटिश काळाची आठवण' असे म्हणायला हरकत नाही. राजभवन हे महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आहे. राजभवन मुंबईतील मलबार हिल्सच्या टोकावर आहे. हे ५० एकर जंगलात स्थित आहे. राजभवनाला तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढले आहे. या मालमत्तेत अनेक हेरिटेज बंगले, विस्तृत लॉन आणि समुद्र किनारा आहे. पूर्वी याला सरकारी हाऊस (Government House)म्हटले जायचे.
ब्रिटिश वसाहतीच्या सरकारने १८८५ मध्ये राजभवन बांधले. विशेष म्हणजे, ज्या व्यक्तीने गेट वे ऑफ इंडिया बांधले आहे. त्याच व्यक्तीने राजभवन बांधले आहे. या इमारतीत भारतीय आणि ब्रिटीश शैलीचे मिश्रण आहे. राजभवनाच्या मध्यभागी मोठा घुमट आणि चार स्तभांचा भव्य मंडप आहे.
राजभवनाला भेट देण्यासाठी प्री बुकिंग आवश्यक
राजभवनाला भेट देण्यासाठी बुकिंग करणे आवश्यक आहे. बुकिंगनुसार, आपल्याला स्लॉट बुक करावे लागतील. बुकिंगशिवाय राजभवनाला भेट देण्यास परवानगी नाही.
राजभवनाला भेट देण्यासाठी https://rbvisit.rajbhavan-maharashtra.gov.in/ या वेबसाईवर भेट द्या.
वेबसाईटवर साइन-इनवर क्लिक करा.
त्यानंतर तुमचा ईमेल आयडी टाकून माहिती भरा.
तुमच्या ईमेलवर ओटीपी आला असेल तो तिथे सबमिट करा.
त्यानंतर डॅशबोर्डवर जाऊन तुमच्या खात्यात लॉग इन करा.
त्यानंतर तुमच्याकडे ऑनलाईन बुकिंगचा पर्याय येईल. तिथे भेट देण्याची तारीख, वेळ आणि किती जागा बुक करायच्या आहेत त्याची माहिती लिहा.
त्यानंतर तुमची स्वतः ची माहिती भरा. त्यात नाव, पत्ता, लिंग, ईमेल आयडी तसेच वाहन क्रमांक इत्यादी माहिती भरा.
यानंतर तुमचा फोटो आणि ओळखपत्राचे फोटो अपलोड करा.
पेमेंटसाठी तुम्ही नेट बँकिग, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचा वापर करु शकता. राजभवनाला भेट देण्यासाठी अंदाचे किंमत २५ रुपये आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.