Air Pollution And Pneumonia : मुंबईकरांचा श्वास कोंडला परंतु, न्यूमोनियाचा धोका वाढला !

नुकत्याच बदलेल्या हवामानामुळे मुंबईतील प्रदूषणात प्रचंड बदल होताना दिसत आहे.
Air Pollution And Pneumonia
Air Pollution And Pneumonia Saam Tv

Air Pollution And Pneumonia : नुकत्याच बदलेल्या हवामानामुळे मुंबईतील प्रदूषणात प्रचंड बदल होताना दिसत आहे. मुंबईतील बदललेल्या वातावरणाचा फटका मुंबईकरांना बसला असून लहान मुलांवरही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे.

प्रदूषण म्हटलं की, हवा, पाणी इत्यादी प्रदूषित करण्याची प्रक्रिया होऊन आपल्या शरिरावर त्याचा वाईट परिणाम होतो. मुंबईच्या (Mumbai) हवेचा दर्जा गेल्या आठवडाभरापासून बिघडला आहे. एक्यूआय साधारण ३०० च्या वर नोंदवला गेला आहे. (Health)

श्वसनविकार बळावले असून दमा, सर्दी, खोकला, श्वसनास त्रास, घसा धरणे इत्यादीबरोबरच न्यूमोनियाचा धोका वाढला आहे. दिवसभर उकाडा आणि संध्याकाळी-रात्री थंडी अशा वातावरणाचा त्रास नागरिकांना होत आहे.

Air Pollution And Pneumonia
Air Pollution : वाढत्या प्रदूषणापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी आहारात 'या' Booster Food चा समावेश करा

मुंबईतील बदलत्या वातावरणामूळे येथे प्रकरणे वाढली आहेत. सर्दी, खोकला, ताप, नाक वाहणे, जुलाब आणि अशक्तपणा अशी लक्षणे दूर होण्यास सुमारे १५ दिवस लागतात. डॉक्टरांच्या मते अशा वातावरणात लोकांनी न्यूमोनिया आणि फ्ल्यूची लस घेणे, हातांची स्वच्छता राखणे, संसर्ग टाळणे, हाताच्या पृष्ठभागाचे निर्जंतुकीकरण करणे, श्वासोच्छ्वासाचे व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे अत्यावश्यक आहे.

हिवाळा सुरू झाला की, श्वसनासंबंधीत आजारांचे प्रमाण वाढते. हवामानातील सततच्या बदलांमुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात. त्यामूळे मुंबईमध्ये वातावरणाच्या बदलानंतर एका आठवड्यात न्यूमोनियाचे सुमारे सात रुग्ण अशा समस्या घेऊन रुग्णालयात दाखल झाले आहेत.

Air Pollution And Pneumonia
Pollution Affect Health : वाढत्या प्रदूषणामुळे वाढू शकते का साखरेची पातळी? जाणून घ्या, तज्ज्ञांचे मत

आपण हिवाळ्यात बुरशी, जिवाणू अन् विषाणूंच्या संपर्कात आल्याने न्यूमोनिया होतो. परिणामी, रुग्णांमध्ये गुंतागुंत होऊन मृत्यूचे प्रमाण जास्त वाढते. न्यूमोनिया शिंकल्याने किंवा खोकल्याने पसरतो.

दमा, ब्राँकायटिस, जन्मजात हृदयविकार, किडनीचे आजार आणि श्वसनासंबंधीच्या इतर समस्यांसारख्या फुप्फुसाच्या तीव्र समस्या आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या मुलांना न्यूमोनिया होण्याची शक्यता असते.

ते प्राणघातक असून फुप्फुसाचे गंभीर नुकसान होऊ शकते, असे सल्लागार बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत मोरलवार यांनी सांगितले. ग्रीन हाऊस, ओझोन लेयर, इंधन इत्यादी मुद्दयांबाबत मुलांना शिकवले पाहिजे. त्यात त्यांचा सहभाग वाढवायला हवा, असे बालरोगतज्ज्ञ डॉ. समीर दलवाई म्हणाले.

मुलांसाठी तज्ज्ञांचा सल्ला -

  • न्यूमोनिया एक संसर्ग असून त्यासाठी वेळीच व्यवस्थापनाची आवश्यकता असते. न्यूमोनिया टाळण्यासाठी मुलांना जास्त गर्दीत नेऊ नये. आजारी व्यक्तींशी मर्यादित संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करावा.

  • खोकताना नाक आणि तोंड झाकून घ्यावे. न्यूमोनिया आणि फ्ल्यूच्या लसी घ्याव्यात. हात चांगले धुवावेत.

  • पोषक घटक असलेले पदार्थ खावेत. श्वासोच्छ्वासाचे व्यायाम करावेत.

  • हिवाळ्यात मुलांना ऊबदार कपडे घालून थंडीपासून संरक्षण करा.

  • मुलांना ताजे अन्न, उकळून थंड केलेले पाणी आणि गरम सूप द्या. घरात ह्यूमिडिफायर वापरा आणि प्रदूषणापासून दूर राहा.

डॉ. समीर दलवाई, बालरोगतज्ज्ञ यांच्या मते हवेच्या खराब गुणवत्तेमुळे श्वसनविकार होतात. अस्थमा वा अॅलर्जी वाढते. असे आजार नसलेले वाईट हवेत राहिले तर त्यांच्या एकूणच जीवनावर परिणाम होतो. प्रदूषणाच्या दुष्परिणांमाविषयी मुलांना आधीपासूनच माहिती देणे गरजेचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com