Narali Purnima 2022 : सण आयलाय गो नारळी पुनवेचा! नारळी पौर्णिमेच्या दिवशी असा बनवा नारळी भात

नारळी भात प्रामुख्याने नारळी पौर्णिमेच्या दिवशी तयार केला जातो. या खास दिवशी कोळी समाजातील मच्छीमार नारळापासून बनवलेला पदार्थ तयार करतात.
Narali purnima 2022, Recipe, Food, Narali Bhat
Narali purnima 2022, Recipe, Food, Narali BhatSaam Tv

Narali Purima 2022 : श्रावणातील शुक्ल पक्षात येणाऱ्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणून ओळखले जाते. यादिवशी कोळीबांधव समुद्राची पूजा करुन नारळ अर्पण करतात.

हे देखील पहा -

प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या सणांनुसार वेगवेगळ्या पदार्थांची चव चाखायला मिळते. नारळी भात प्रामुख्याने नारळी पौर्णिमेच्या दिवशी तयार केला जातो. या खास दिवशी कोळी समाजातील मच्छीमार नारळापासून बनवलेला पदार्थ तयार करतात. महाराष्ट्रातील बहुतेक भागात नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी देशभरात रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या खास दिवशी, मच्छीमार वरुण देवाला प्रसन्न करण्यासाठी समुद्रात नारळ अर्पण करतात. या खास दिवशी नारळापासून बनवलेले पदार्थ तयार केले जातात. या दिवशी नारळी भात, नारळी करंजी आणि नारळी वडी यांचा समावेश होतो. हा भात (Rice) बनवताना गूळ, नारळ व तांदळाचा वापर करुन ते बनवले जातात. हे खाण्यास चविष्ट व आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. नारळी भातात गूळाचा वापर केल्याने तो आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे. ज्यामुळे आपल्या शरीरातील कॅलरीज अधिक प्रमाणात वाढत नाहीत. जाणून घेऊया नारळी भाताची रेसिपी

नारळी भात बनवण्याची साहित्य -

बासमती तांदूळ - १/२ कप

केशर - ६ ते ७ काड्या

तूप - १ मोठा चमचा

गूळ - १/२ कप

किसलेले खोबरे - १/२ कप

छोटी वेलची - २

लवंगा - ३

दालचिनीचा तुकडा - १ इंच

मीठ - चवीनुसार

वेलची पावडर - - १/२ चमचा

काजू व बेदाणे आणि पाणी - आवश्यकतेनुसार

Narali purnima 2022, Recipe, Food, Narali Bhat
Raksha Bandhan Special Recipe : रक्षाबंधनच्या दिवशी अशी बनवा बेसनापासून ही रेसिपी

कृती -

सर्वप्रथम नारळी भात बनवण्यासाठी तांदूळ ३० मिनिटे पाण्यात (Water) भिजत ठेवा. यानंतर दुसरीकडे कढई मध्यम आचेवर गरम करून त्यात तूप घाला. तूप गरम झाल्यावर त्यात तांदूळ घालून एक मिनिट शिजवा. थोड्या वेळाने एक वाटी पाणी, मीठ आणि केशर घेऊन दुस-या पातेल्यात तूप घालून काजू, बेदाणे सोनेरी होईपर्यंत शिजवा. यानंतर गूळ आणि खोबरे घालून चांगले शिजवून घ्या. गूळ चांगला शिजल्यावर त्यात तांदूळ घालून मिक्स करून झाकण ठेवून साधारण ५ मिनिटे शिजवा. यानंतर शेवटी वेलची पूड मिक्स करून गॅस बंद करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com