
Nashik News: तुम्हीही चिकन खात असाल, तर सावधान.. कारण कोंबडीच्या गर्भात शास्त्रज्ञांना प्लॅस्टिक (Nashik News) आढळून आले असून असं चिकन (Chicken) खाल्ल्यास त्याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो; अशी माहिती शास्त्रज्ञांच्या अभ्यासात समोर आली आहे. (Breaking Marathi News)
नेदरलँडच्या लीडेन विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ मीरू वांग यांनी हा अभ्यास केला. शास्त्रज्ञांना कोंबडीच्या गर्भात अत्यंत सूक्ष्म असं नॅनोप्लॅस्टिक मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे. त्यामुळे कोंबड्यांच्या शरीरातील टिश्यूंचे नुकसान होत आहे. हे खूप हानिकारक असून यामुळे केवळ कोंबडीच नाही; तर कोंबडी खाणाऱ्या माणसांनाही हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात.
शरीरावर वाईट परिणाम
चिकन ही नॉन व्हेज खाणाऱ्यांची सर्वात आवडती गोष्ट आहे. मात्र हेच चिकन कदाचित तुम्ही भविष्यात खाऊ शकणार नाही. कारण शास्त्रज्ञांना कोंबडीच्या गर्भात प्लास्टिक आढळून आलं आहे. या प्लास्टिकचा गर्भावर वाईट परिणाम होऊन कोंबड्यांचा गर्भातील विकास खुंटतो आणि आपण जर अशी कोंबडी खाल्ली; तर त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होईल. अशी घाबरवणारी माहिती शास्त्रज्ञांच्या अभ्यासात पुढे आली.
कोंबड्यांमध्ये हे आले आढळून
शास्त्रज्ञांच्या मते कोंबड्यांमध्ये सर्वाधिक पॉलिस्टीरिन कण आढळले आहेत. कोंबडीच्या गर्भाच्या सुरुवातीच्या टप्प्यात प्लास्टिक सापडू लागले आहे. कोंबड्यांच्या शरीराच्या यकृत, मूत्रपिंड आणि आतड्यांमध्ये पॉलिस्टीरिन मायक्रोप्लास्टिक्स आढळून आले आहेत. स्टेम सेलच्या आतील न्यूरल क्रेस्ट सेलमध्ये प्लास्टिक पोहोचले आहे. त्याद्वारे ते हृदय, रक्तवाहिन्या, चेहरा आणि मज्जासंस्थेमध्ये प्रवेश करत आहे. तपासण्यात आलेल्या कोंबड्यांचे डोळे बरोबर नव्हते. ते लहान होते. इतर कोंबड्यांचा चेहऱ्याचा आकार खराब झालेला होता. काहींच्या हृदयाचे स्नायू पातळ होते. तसेच त्याच्या हृदयाचे ठोके देखील कमकुवत होते. हा अभ्यास एन्व्हायर्नमेंट इंटरनॅशनलमध्ये प्रकाशित झाला. भारतात अद्याप अशा प्रकारचं संशोधन झाल्याचं समोर आलेलं नसलं तरी परदेशातील या संशोधनामुळे नक्कीच चिंता वाढलीय.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.