National Engineer's Day 2022 : अभियंता दिवस का साजरा केला जातो ? या दिवसाची सुरुवात कोणी केली ?

सिव्हिल अभियंता विश्वेश्वरय्या यांनी आधुनिक भारतातील धरणे, जलाशय आणि जलविद्युत प्रकल्पांच्या बांधकामात महत्त्वाची भूमिका बजावली.
National Engineer's Day 2022
National Engineer's Day 2022Saam Tv

National Engineer's Day 2022 : दरवर्षी १५ सप्टेंबर हा दिवस देशात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस देशाचे महान अभियंता आणि भारतरत्न पुरस्कार विजेते मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना समर्पित आहे.

एम विश्वेश्वरय्या यांनी राष्ट्र उभारणीत मोठे योगदान दिले होते, यामुळे दरवर्षी १५ सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस देशभरात अभियंता दिन साजरा केला जातो. सिव्हिल अभियंता विश्वेश्वरय्या यांनी आधुनिक भारतातील धरणे, जलाशय आणि जलविद्युत प्रकल्पांच्या बांधकामात महत्त्वाची भूमिका बजावली. सरकारने १९५५ मध्ये त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले.

National Engineer's Day 2022
Relationship Tips : पार्टनरसोबत भांडण झालंय? 'असा' घालवा रुसवा, पण त्याचवेळी सुखद...

हा दिवस देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या देशातील सर्व अभियंत्यांच्या परिश्रम आणि समर्पणाला सलाम करण्याचा दिवस आहे. या अभियंत्यांच्या अथक परिश्रमामुळे लोकांच्या जीवनात मोठा बदल झाला आहे. देशातील अभियंत्यांनी त्यांच्या शोधांमुळे सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य केले आहे.

एम विश्वेश्वरय्या कोण होते ?

विश्वेश्वरय्या यांना देशात सर एमव्ही म्हणूनही ओळखले जात होते. भारतरत्न पुरस्कार विजेते एम विश्वेश्वरय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६१ रोजी म्हैसूरच्या कोलार जिल्ह्यातील काकबल्लापूर तालुक्यात एका तेलुगू कुटुंबात झाला. विश्वेश्वरयांच्या वडिलांचे नाव श्रीनिवास शास्त्री होते, ते संस्कृत विद्वान आणि आयुर्वेदाचे डॉक्टर होते.

१८८३ मध्ये पूनाच्या सायन्स कॉलेजमधून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर विश्वेश्वरय्या यांना सहाय्यक अभियंता पदावर लगेचच सरकारी (Governments) नोकरी मिळाली. ते म्हैसूरचे १९ वे दिवाण होते आणि १९१२ ते १९१८ पर्यंत त्यांनी काम केले. म्हैसूरमध्ये केलेल्या कामांमुळे त्यांना आधुनिक म्हैसूरचे जनक म्हटले जाते. त्यांनी म्हैसूर सरकारच्या सहकार्याने अनेक कारखाने आणि शैक्षणिक संस्था स्थापन केल्या होत्या.

National Engineer's Day 2022
Game of Names : तुमच्या बाळाचे नाव देखील 'हे' आहे? जाणून घ्या, नावांच्या या गंमती-जमती

मंड्या जिल्ह्यातील कृष्णराजा सागर धरणाच्या उभारणीत त्यांनी मोठे योगदान दिले. डॉ मोक्षगुंडम यांना कर्नाटकचे भगीरथ असेही म्हणतात. डॉ. मोक्षगुंडम यांचे १९६२ मध्ये वयाच्या १०२ व्या वर्षी निधन झाले.

अभियंता दिनानिमित्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल पुरस्कार प्रदान केले जातात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com