
Navratri Special Recipe 2022 : शारदीय नवरात्री अवघ्या काही दिवसात येत आहे. ही नवरात्री दुर्गा देवीला समर्पित असून या दिवसात दुर्गा देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. यंदा ही नवरात्री २६ सप्टेंबरपासून सुरु होत आहे.
नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीचे भक्त तिची मनोभावे पूजा व अर्चना करतात. तिचा नऊ दिवस उपवास देखील करतात. या काळात बरेच लोक अन्न व पाणीविरहीत उपवास करतात. या काळात काही लोक फक्त दिवसातून एकदाच खातात. त्यामुळे त्यांना अपचनाच्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यासाठी जाणून घेऊया पोट भरलेले राहिल व अपचनाचा त्रास होणार नाही अशी उपवासाची शंकरपाळी.
कृती -
- सर्वप्रथम आपण राजगिऱ्याचे पीठ चाळून घ्या. त्यानंतर थंड दूधात अर्धा कप पिठी साखर विरघळ्यासाठी दूध कोमट गरम करुन घ्या.
- फोडणीच्या भांड्यात २ चमचे तूप घेऊन गरम करुन घ्या.
- राजगिऱ्या पिठात तयार केलेले तूपाचे मोहन घाला. त्यात चिमूटभर मीठ घालून मिश्रण चांगले मिक्स करा.
- तयार मिश्रणात दूध व पिठसाखरेचे तयार केलेले मिश्रण हळूहळू घाला व पीछ चांगले मळून घ्या. त्यानंतर तयार कणीक अर्धातास ठेवा. शंकरपाळी करताना कणीक तयार करतो अगदी तसेच करावे.
- कणकेचे गोळा तयार करुन घ्या. लाटण्याला तूप लावून जाडसर चपातीसारखे लाटून घ्या. शंकरपाळ्याचा आकार देऊन मंद आचेवर तळून घ्या. लालसर झाले की, काढा.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.