Netflix and Amazon Free Subscription : Netflix आणि Amazon प्राइम व्हिडिओचा विनामूल्य आनंद घ्यायचा आहे ? तर, फक्त 'हे' करा

तुम्हाला सांगितले की, मेंबरशिप न घेता आपण Netflix आणि Amazon हवी ती हव्या तशा वेब सीरिज आपल्याला पाहता येतील. तर...
Netflix and Amazon Free Subscription
Netflix and Amazon Free SubscriptionSaam Tv

Netflix and Amazon Free Subscription : चित्रपट किंवा आपल्या आवडणारी वेबसिरीज प्रत्येकालाच निवांतपणे बसून पाहण्याची आवडत असते. हल्ली व्यस्त जीवनशैलीतुन प्रत्येकाला ते पाहता येत नाही. म्हणून त्यांना मिळेल त्या ठिकाणी ते पाहण्याचा अट्टहास प्रत्येक जण करत असतो.

नुकतेच OTT चे क्रेझ तरुणापासून वयोवृध्दापर्यंत प्रत्येकाला लागले आहे. ज्यात Netflix आणि Amazon हे आघाडीचे अॅप्स आहेत. यावरच्या सीरिज (Series) पाहण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या रुपात त्याची किंमत मोजतात. परंतु, जर आम्ही तुम्हाला सांगितले की, मेंबरशिप न घेता आपण Netflix आणि Amazon हवी ती हव्या तशा वेब सीरिज आपल्याला पाहता येतील. जाणून घेऊया, त्याबद्दल (Latest Marathi News)

Netflix and Amazon Free Subscription
Tech News: सिमकार्ड घेताना 'ही' चूक करु नका; अन्यथा व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम वापरल्यास जाल तुरुंगात

जर तुम्ही टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचे यूजर असाल तर तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, जिओच्या यूजर्ससाठी अनेक उत्तम योजना आहेत. या Jio प्लॅन्स वापरकर्त्यांना कमी किमतीत केवळ डेटा आणि कॉलिंगचाच फायदा देत नाहीत तर OTT अॅप्सचे मेंबरशिप देखील देतात, हे रिचार्ज प्लॅन कोणते आहेत ते पाहूया

Jio Recharge Plans :

Jio 399 Plan Details : या Jio पोस्टपेड प्लॅनसह, कंपनीद्वारे (Company) वापरकर्त्यांना 75 GB हाय-स्पीड डेटा ऑफर केला जातो. डेटासह, वापरकर्त्यांना कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस दिले जातात.

या प्लानची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या प्लानमध्ये तुम्हाला 200 GB डेटा रोलओव्हरची सुविधा देखील मिळेल. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की 75 जीबी हाय-स्पीड डेटानंतर, प्रति जीबीची किंमत 10 रुपये असेल. वैधतेबद्दल बोलायचे तर, हा एक पोस्टपेड प्लॅन आहे, त्यामुळे या प्लॅनची ​​वैधता एका बिल सायकलची असेल.

Netflix and Amazon Free Subscription
Technology : Google Translation सेवा आता बंद !

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, या प्लॅनमध्ये तुम्हाला केवळ Amazon Prime Video वरच नाही तर Netflix देखील फ्रीमध्ये मिळेल. म्हणजेच, तुम्हाला Amazon Prime Video किंवा Netflix चे सबस्क्रिप्शन वेगळे खरेदी करावे लागणार नाही.

तुम्हाला फक्त Jio 399 प्लॅनमधून रिचार्ज करायचे आहे आणि एवढेच, तुम्ही या दोन्ही OTT अॅप्समध्ये विनामूल्य प्रवेश मिळवून अमर्यादित वेब सीरिज आणि मूळ शोचा मोफत आनंद घेऊ शकता. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, तुम्हाला संपूर्ण वर्षासाठी Amazon Prime Video फ्रीमध्ये पहाता येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com