Facebook: फेसबुकच्या कर्मचाऱ्यांना नवी ओळख; आता 'या' नव्या नावानं संबोधलं जाणार

Facebook Matamates: गुगलच्या कर्मचाऱ्यांना गुगलर्स (Googlers) तर मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांना मायक्रोसॉफ्टीज् (Microsofties) असं संबोधलं जातं.
New identities for Facebook employees; Now it will be called metamates by a new name
New identities for Facebook employees; Now it will be called metamates by a new nameSaam Tv

जगातील सर्वात लोकप्रिय आणि मोठी सोशल मीडिया कंपनी फेसबुकने मागच्या वर्षी २८ ऑक्टोबरला आपलं नाव बदललं होतं. फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या कंपनीचं फेसबुक (Facebook) हे नाव बदलत मेटा (Meta) असं केलं होतं. आता त्याचाच पुढचा भाग म्हणून फेसबुकनं आपल्या कर्मचाऱ्यांनाही नवी ओळख दिली आहे. याआधी फेसबुकमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फेसबुकर्स (Faceboockers) म्हणून संबोधलं जात होतं. आता फेसबुकने कंपनीचं नाव मेटा ठेवल्याने फेसबुकच्या कर्मचाऱ्यांना यापुढे मेटामेट्स म्हणू संबोधलं जाणार आहे. (New identities for Facebook employees; Now it will be called metamates by a new name)

हे देखील पहा -

गुगल आणि मायक्रोसॉफ्टनेही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी असं केलं होतं. गुगलच्या कर्मचाऱ्यांना गुगलर्स (Googlers) तर मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांना मायक्रोसॉफ्टीज् (Microsofties) असं संबोधलं जातं. त्यानुसार आता फेबबुकर्स यांना मेटामेट्स (Metamates) म्हणू नवी ओळख मिळाली आहे.

काय आहे कंपनीचा प्लॅन?

मार्क झुकरबर्गने आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे की, कंपनी आपले मूल्य 'मूव्हिंग फास्ट' वरून 'मूव्ह फास्ट टूगेदर'मध्ये बदलत आहे. ते म्हणाले आहे , की हे सर्व एकत्र वेगाने पुढे जाण्यासाठी आहे. आपण एकट्याने नव्हे तर एक कंपनी म्हणून एकत्रितपणे एका दिशेने वाटचाल केली पाहिजे. याव्यतिरिक्त, मार्क झुकेरबर्ग त्याच्या कर्मचार्‍यांना नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करतो ज्याचा परिणाम सर्वात जास्त आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com