आधार Verificationसाठी नवा नियम; आता तुमच्या स्वाक्षरीला महत्त्व

नवीन नियमानुसार, तुमचा आधार ऑफलाइन किंवा कोणत्याही इंटरनेटशिवाय किंवा ऑनलाइन तपासता येईल.
आधार Verificationसाठी नवा नियम; आता तुमच्या स्वाक्षरीला महत्त्व
आधार Verificationसाठी नवा नियम; आता तुमच्या स्वाक्षरीला महत्त्वSaam Tv

आधार कार्ड हे भारतातील एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आधार कार्डशिवाय देशात कोणतेही काम होऊ पुर्ण होवू शकत नाही. UIDAI सुद्धा आधारशी संबंधित माहिती वेळोवेळी देते. सरकारने आधार पडताळणीबाबत (Aadhaar Verification) नवा नियम जारी केला आहे. हा नवा नियम आधार कार्डच्या ऑफलाइन पडताळणीशी संबंधित आहे. नवीन नियमानुसार, तुमचा आधार ऑफलाइन किंवा कोणत्याही इंटरनेटशिवाय किंवा ऑनलाइन तपासता येईल.

सरकारचा नवीन नियम

सरकारने काढलेल्या नवीन नियमांनुसार, आता तुम्हाला पडताळणीबाबत डिजिटल स्वाक्षरी असलेले दस्तऐवज द्यावे लागणार आहेत. हे डिजिटल सही केलेले डॉक्युमेंट आधारची सरकारी संस्था, UIDAI द्वारे जारी केले जाणार आहेत. या डॉक्युमेंटवर वापरकर्त्याच्या आधार क्रमांकाचे शेवटचे चार अक्षर दिलेले असतील.

आधार Verificationसाठी नवा नियम; आता तुमच्या स्वाक्षरीला महत्त्व
Latur: भीषण अपघात! तरुणाच्या पोटातून लोखंडी रॅड आरपार; एकाचा मृत्यू

KYC तपशीलवार प्रक्रिया जाणून घ्या

महत्त्वाचे म्हणजे, भारत सरकारने आधार नियमावली, 2021 8 नोव्हेंबर 2021 रोजी अधिसूचित केली. त्यानुसार 9 नोव्हेंबर रोजी सूचना अधिकृत वेबसाइटवर जारी करण्यात आली आहे. यामध्ये ई-केवायसीसाठी (e-kyc) आधारच्या ऑफलाइन पडताळणीची तपशीलवार प्रक्रिया सांगण्यात आली आहे.

नवीन नियमात काय आहे, हे जाणून घ्या?

या नवीन नियमात, आधार धारकाला आधार E-KYC पडताळणी प्रक्रियेसाठी कोणत्याही अधिकृत एजन्सीला आपला आधार पेपरलेस ऑफलाइन ई-केवायसी देण्याचा पर्याय उपलब्ध करुण देण्यात आला असून यानंतर एजन्सी आधार धारकाने दिलेला आधार क्रमांक आणि नाव, पत्ता इत्यादी केंद्रीय डेटाबेसशी जुळवून बघेल. सर्व योग्य वाटल्यानंतरच पडताळणीची प्रक्रिया पुढे सुरु ठेवली जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com