Breastfeeding week, Baby and Mom care, Child care, Health issue
Breastfeeding week, Baby and Mom care, Child care, Health issue ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Newborn baby care Tips : स्तनपान करणाऱ्या आईने चुकूनही या गोष्टी करु नका, बाळासोबत आपल्यालाही होऊ शकते नुकसान

स्तनपान करताना बाळाच्या शारीरिक व मानसिक विकासावर परिणाम होतो का ?

Newborn baby care Tips : नवजात बाळाचे आरोग्य जपण्यासाठी आई अनेक प्रयत्न करत असते. बाळ लहान असल्यामुळे ते आईच्या दुधाव्यतिरिक्त कोणत्याच पदार्थांचे सेवन करत नाही.

हे देखील पहा -

दरवर्षी १ ते ७ ऑगस्ट दरम्यान जगभरात जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. आई आणि बाळासाठी स्तनपानाच्या फायद्यांविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी हा सप्ताह साजरा केला जातो. आई आणि बाळाच्या आयुष्यातील स्तनपान हा एक अनोखा टप्पा आहे. असे म्हटले जाते की स्तनपानामुळे आई आणि बाळामधील बंध मजबूत होतात. स्तनपान हा बाळाच्या विकासासाठी आवश्यक पोषक तत्वे प्रदान करण्याचा आणि पूर्णपणे सुरक्षित ठेवण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे. आईचे दूध हे बाळासाठी एक उत्तम देणगी आहे ज्यामध्ये त्याला संपूर्ण पोषण देण्याची क्षमता असते. त्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे अँटीबॉडीज आणि निरोगी एन्झाइम असतात. हे केवळ आपल्या मुलाच्या शारीरिक आणि मानसिक विकासाला चालना देत नाही तर आपल्या स्वतःच्या आरोग्याचे रक्षण करते. स्तनपान करताना त्वचेचा त्वचेशी संपर्क होत असल्याने, आपल्याला आपल्या बाळाला दूध पाजताना स्वच्छतेची काही काळजी घेणे फार महत्वाचे आहे.

१. बाळाला स्तनपाण करण्यापूर्वी आणि नंतर आपले हात स्वच्छ करावेत. बाळासोबत व आपली स्वच्छता राखणे अधिक महत्त्वाचे आहे. आईचे दूध पाजताना तिचे हात स्वच्छ असले पाहिजेत, त्यामुळे आपल्या हातात असणारे जंतू बाळापर्यंत पोहोचू शकत नाही.

Breastfeeding week, Baby and Mom care, Child care, Health issue
Kids Health Tips : मुलांना अॅलर्जी होतेय ? हे सामान्य आहे का ? याचे नेमके कारण काय ?

२. कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून बाळाचे संरक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक आईने आपले स्तन कोमट पाण्याने स्वच्छ करावे व आहार देण्यापूर्वी कापसाचे किंवा रेशमाचे कपड्याने ते पुसावे.

३. लहान मुलासह (Child), स्वच्छतेची खूप काळजी घ्यावी लागते. विशेषत: जेव्हा स्तनपानाचा प्रश्न येतो तेव्हा स्वच्छतेच्या या नियमाचे पालन करणे अधिक महत्वाचे आहे. लक्षात ठेवा की आपण ज्या खोलीत स्तनपान करु ती खोली स्वच्छ आणि हवेशीर असावी. जंतू आणि संसर्ग बाळापासून दूर ठेवण्यासाठी दर काही दिवसांनी बेडशीट बदला.

४. गर्भधारणेनंतर प्रत्येक स्त्रीला (Women) दररोज स्तनांच्या आकारात बदल जाणवतो. त्यामुळे आपण कोणते कपडे परिधान करतो यावर विशेष भर द्या. या दिवसांत कपडे हे सुती असायला हवे. गरोदरपणानंतर स्लीम दिसण्यासाठी खूप घट्ट कपडे घालणे टाळावे. आपली त्वचा श्वास घेऊ शकेल असे कपडे असावेत. यामुळे घाम येणे आणि बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता कमी होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com