
'दूध सी सफेदी, निरमा से आई... निरमा, निरमा, वॉशिंग पावडर निरमा...' अशी ख्याती असलेला ब्रँड म्हणजे निरमा. निरमाने भारतात वॉशिंग पावडरची खरी ओळख निर्माण केली.
प्रत्येक गृहिणीची गरज ओळखून आणि सर्वसामान्यांना खरेदी करता येईल असा वॉशिंग पावडर निरमा म्हणून ओळखला जाऊ लागला. स्वप्न बघून ते पूर्ण करण्याची ताकद ठेवणाऱ्या निरमाचे संस्थापक करसनभाई पटेल यांची कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
प्रत्येकाने लहानपणी निरमाची जाहिरात पाहिली असेलच. पांढऱ्या फ्रॉकमधील ती लहान मुलगी निरमाची ओळख बनली. पूर्वीच्या काळी निरमा घरोघरी वापरला जायची. आजही त्याची क्रेझ कायम आहे. करसनभाई पटेल यांनी स्वतःच्या मेहनतीने निरमाचे नाव खूप मोठे केले आहे.
प्रत्येकाने लहानपणी निरमाची जाहिरात पाहिली असेलच. पांढऱ्या फ्रॉकमधील ती लहान मुलगी निरमाची ओळख बनली. पूर्वीच्या काळी निरमा घरोघरी वापरला जायची. आजही त्याची क्रेझ कायम आहे. करसनभाई पटेल यांनी स्वतःच्या मेहनतीने निरमाचे नाव खूप मोठे केले आहे.
करसनभाई यांचा जन्म गुजरातमधील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी बीएससीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून करिअरला सुरुवात केली. परंतु एवढ्या कमी पैशात कुटुंब सुखी राहत नव्हते आणि व्यवसाय सुरू करण्याची त्यांची खूप इच्छा होती.
आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी पटेल यांनी बाजारातील गरज ओळखून कमी किमतीची डिटर्जंट बनवण्याचा निर्णय घेतला. घराच्या मागे एका लहान जागेत त्यांनी पावडर बनवण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ती पावडर घरोघरी जाऊन विकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला अवघ्या ३ रुपयांत प्रति किलो पावडर विकली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांनी या क्षेत्रात खूप प्रगती केली.
निरमा कंपनीने बाजारात खूप नाव कमावले. ब्रँडच्या या नावामागेदेखील एक कहाणी आहे. निरमा नाव करसनभाई पटेल यांच्या मुलीच्या नावावरुन ठेवण्यात आले. करसनभाई यांच्या मुलीचे नाव निरुपमा होते. त्यांचे त्यांच्या मुलीवर खूप प्रेम होते. परंतु त्यांच्या मुलीचा एका अपघातात दुर्देवी मृत्यू झाला.
मुलीच्या मृत्यूनंतर करसनभाई खूप खचले होते. आपली मुलगी मोठी व्हावी तिने खूप शिकावे अशी त्यांची इच्छा होती. परंतु लहान वयातच तिचा मृत्यू झाला. करसनभाई यांनी मुलीची आठवण आणि त्यांच्या मुलीबद्दल संपूर्ण जगाला समजावे म्हणून कंपनीचे नाव निरमा ठेवले.
आज निरमा ही सुप्रसिद्ध कंपनी आहे. कंपनीने मार्केटमध्ये खूप नावलौकिक कमावले आहे. एका रिपोर्टनुसार, पटेल यांची एकूण संपत्ती २.९ अब्ज डॉलर आहे. तर कंपनीची वार्षिक उलाढाल जवळपास ७,००० कोटी आहे. पटेल यांना उद्योगरत्न, बिझनेसमॅन अवॉर्ड अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.