तिसरी लाट अजून आली नाही, आरोग्य विभागाची तयारी पूर्ण: राजेश टोपे

तिसरी लाट अजून आली नसून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
राजेश टोपे
राजेश टोपे- Saam Tv

जालना : केंद्राने Central Government सूचना केल्याप्रमाणे तिसऱ्या लाटेची Corona Third Wave राज्य सरकारने तयारी केली असून तिसऱ्या लाटेत एका अंदाजाप्रमाणे ६० लाख लोक कोरोनाने बाधित होतील. मात्र, तिसरी लाट अजून आली नसून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांनी म्हटले आहे.

जालन्यात Jalana आज जिल्हा नियोजन समितीच्या निधितून पोलिसांसाठी प्राप्त झालेल्या चारचाकी, दुचाकी वाहनांचा लोकार्पण सोहळा टोपे यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची Oxygen कमतरता येऊ नये म्हणून प्रत्येक जिल्हाधिकारी आणि खाजगी हॉस्पिटलला Hospital ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचे आदेश देण्यात आले असून राज्यात ४ हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासेल असंही त्यांनी सांगितलं.

हे देखिल पहा

तिसऱ्या लाटेत आरोग्य विभागात मनुष्यबळ कमी पडू नये म्हणून रिक्त जागा भरण्याचा राज्य सरकारचा विचार सुरु असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.तिसऱ्या लाटेत औषधी आणि आवश्यक साहित्यांची कमतरता पडू नये म्हणून पावसाळी अधिवेशनात आरोग्य विभागासाठी साडेबाराशे कोटी रुपये मंजूर करून घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.

राजेश टोपे
साडीची झोळी अन्‌ बांम्बूलेन्स ते ॲम्‍बुलन्‍स! वर्डीच्‍या विमान दुर्घटनेतील तो प्रसंग..

नागरिकांनी नियमांच पालन केल्यास तिसरी लाट थोपवता येईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.राज्यात अजून तिसरी लाट आली नसून राज्यातील १० जिल्ह्यांची सरासरी राज्यापेक्षा जास्त असली तरी या जिल्ह्यांची दररोजची रुग्णसंख्या घटत असल्याचं देखील ते म्हणाले. निर्बंधाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Edited By - Amit Golwalkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com