
एकेकाळी मोबाईलच्या जगात सर्वात लोकप्रिय कंपनी म्हणून नोकिया कंपनी ओळखली जायची. नोकियाची क्रेझ मागील काही वर्षात कमी झालेली पाहायला मिळाली. परंतु नोकिया कंपनी नेहमीच ग्राहकांसाठी काही न काही नवीन बाजारात आणत असतो. असाच एक नवीन फोन नोकियाने भारतात लाँच केला आहे.
मागील नोकियाच्या फोननंतर हा फोन नवीन वैशिष्ट्यांसह बाजारात उपलब्ध होणार आहे. सर्व प्रकारच्या चाचणीनंतर हा फोन बाजारात आला आहे. असं कंपनीचे म्हणणे आहे. Nokia G42 5G iFixit मध्ये युजर्संना रिपेअरिंग प्रोग्रामदेखील देण्यात आला आहे.
Nokia G42 5G च्या 6GB+128GB मॉडेलची किंमत 12,599 रुपये आहे. हा फोन राखाडी आणि जांभळ्या रंगात उपलब्ध आहे. फोनची विक्री १५ सप्टेंबरपासून अॅमोझॉनवर सुरू होणार आहे.
Nokia G42 5G मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह गोरिला ग्लास 3 आणि सेल्फी शूटरसाठी वॉटरड्रॉप नॉचसोबत 6.56 इंच IPS LCD HD+ डिस्पले आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480+ SoC ने ग्राफिक्ससाठी Adreno GPUने जोडलेला आहे. या फोनमध्ये 4GB/6GB रॅम आणि 128 GB स्टोरेज आहे. यामध्ये मेमरी कार्डचा स्लॉटदेखील आहे.
फोनमध्ये 5GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट आहे. फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा तर 2Mp मॅक्रो लेन्स आणि 2Mp डेप्थ मॉड्यूल आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी 8MP चा शूटर आहे. Nokia G42 5Gमध्ये 20W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh बॅटरी आहे. फोनमध्ये कनेक्टीव्हिटीमध्ये 5G,4G LTE, Wi-FI, Bluetooth,Gps आणि USb Type-c पोर्ट समाविष्ट आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.