Pulses Benefits : फक्त मांस-अंडीच नाही तर, या कडधान्यांमधून मिळते भरपूर प्रोटीन

Benefits Of Pulses : सर्वांनाच माहित आहे की मांस आणि अंड्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते.
Pulses Benefits
Pulses BenefitsSaam Tv

Pulses Benefits For Health : सर्वांनाच माहित आहे की मांस आणि अंड्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. परंतु याचा अर्थ असा नाही होत की शाकाहारी अन्नामध्ये प्रोटीन नसते. अनेक शाकाहारी पदार्थ आहेत. ज्यामध्ये भरभरून प्रोटीन उपलब्ध असते. चला तर मग आज आपण हे जाणून घेऊयात की, भरपूर प्रमाणात प्रोटीन असलेले शाकाहारी पदार्थ नेमके कोणते आहेत.

चने :

चण्यामध्ये उपलब्ध असणारे पोषकतत्व अतिशय वेगळ्या प्रकारचे असतात. दोनशे ग्रॅम उकळलेल्या चण्यांमध्ये 729 कॅलरी उपलब्ध असतात. यामध्ये 67% कार्ब असतात आणि बाकी प्रोटीन आणि फॅट्स असतात.

Pulses Benefits
How to Digest Pulses : कडधान्याचे सेवन केल्यास अपचनाची समस्या होते? तर, 'या' टिप्स फॉलो करा

एक कप चणे खाल्ल्याने तुम्हाला 70 टक्के फॉलेट आणि बावीस टक्के आयरन मिळते. यासोबतच चण्याचे ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा कमी असते. म्हणजेच याला पचवायला शरीराला वेळ लागतो. त्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही आणि शरीरामधील ग्लुकोज लेव्हल अचानक जास्त वाढत नाही.

राजमा :

राजमा हा प्रोटीन, कार्ब, आणि फायबरने भरपूर असतो. घरात (Home) अनेक व्यक्ती राजमा चावल खाण्यासाठी पसंती दाखवतात. राजमा चवीला उत्कृष्ट असल्यासोबत पौष्टिक देखील असतो. राजम्याला तुम्ही पापड आणि लोणच्या सोबत खाऊ शकता.

Pulses Benefits
Pulse Chocolate : पल्स चॉकलेटचे प्रेक्षकांसाठी अनोखे गेम चॅलेंज ; पाहा व्हिडिओ

दूध :

एक व्यक्ती दुधाचे सेवन करण्यास टाळतात. परंतु दूध हे आपल्या शरीरासाठी उत्तम प्रोटीन मानले जाते. प्रोटीन सोबत दुधामध्ये कॅल्शियम देखील भरपूर प्रमाणात असते. जे हाडांसाठी, दातांसाठी, सिस्टम साठी फायदेशीर असतात. दररोज दुधाचे सेवन केल्याने त्वचेवरती ग्लो येतो.

पनीर :

जगभरात चीज जसे प्रसिद्ध आहे, तसेच भारतामध्ये पनीर प्रसिद्ध आहे. पनीरमध्ये एका केसीएनची चांगली मात्रा असते. यामध्ये कॅल्शियमची लेवल भरपूर प्रमाणात असते. पनीरचे सेवन केल्याने तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही आणि तुमचे फॅट बर्न होण्यासाठी मदत होते.

डाळ :

प्रत्येक भारतीय व्यंजनांमध्ये डाळ ही असतेचं. मग उडीद असो , तुर डाळ असो किंवा मग डाळ. डाळ प्रत्येक जेवणाचा एक भाग असते. डाळ बनवणे अतिशय सोपे असते आणि यामध्ये प्रोटीन आणि खनिजे उपलब्ध असतात जे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात.

मटर आणि बिया :

अशी कुठलीच भाजी नाही ज्यामध्ये मटरसारखे प्रोटीन उपलब्ध असेल. त्यामुळे तुम्ही मटर कोणत्याही डिशमध्ये शामिल करू शकता. अशातच प्रोटीन साठी तुम्ही वेगवेगळ्या बियांचे सेवन करू शकता. सूर्यफुलाच्या बिया, तीळ, भोपळ्याच्या बिया, पॉपी सीड्स, या सगळ्या बियांमध्ये हेल्दी फॅक्ट्स उपलब्ध असतात. या सगळ्या बिया सलाडमध्ये आणि रायत्यामध्ये टाकून खाल्ल्या जातात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com