
Nothing Phone 2 : Nothing कंपनीने आपला पहिला पारदर्शक फोन Nothing फोन वन म्हणून गेल्या वर्षी लॉन्च केला. लॉन्च झाल्यानंतर लगेचच या मोबाइल फोनची लोकप्रियता इतकी प्रचंड आहे की आता लोक Nothing फोन 2 ची वाट पाहत आहेत.
कंपनीने गेल्या वर्षी Nothing फोन 1 लाँच केला आणि त्याची विक्री बाजारात चांगली झाली. दरम्यान, कंपनीचे सीईओ कार्ल पै यांनी मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये Nothing फोन 2 बाबत अपडेट (Update) दिले आहे. त्याने सांगितले की Nothing फोन 2 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन चिपसेटसह येईल. म्हणजेच फोनचा (Phone) परफॉर्मन्स आधीपासून असलेल्या फोनपेक्षा चांगला असेल.
कधी होणार सुरू ?
कंपनी या वर्षाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत Nothing फोन लॉन्च करू शकते. कंपनी मोबाईल फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8व्या जनरेशन 1 चिपसेटला सपोर्ट करू शकते.
कंपनीच्या सीईओने सांगितले की, नवीन फोन सध्याच्या स्मार्टफोनपेक्षा अधिक प्रीमियम असेल आणि लोकांना त्यात उत्कृष्ट फीचर्स मिळतील.
मिळालेल्या माहितीनुसार, स्मार्टफोनमध्ये तुम्हाला AMOLED डिस्प्ले मिळेल. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला 33W फास्ट चार्जरसाठी सपोर्ट असलेली 5000 mAh बॅटरी मिळू शकते.
किंमत असू शकते -
इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, नथिंग फोन 2 स्मार्टफोन 40 ते 50,000 रुपयांच्या रेंजमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. फोटोग्राफीसाठी कंपनी तुम्हाला फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आणि 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देऊ शकते.
लक्षात ठेवा, अद्याप स्पेक्स आणि किंमतीबद्दल अधिकृत खुलासा नाही. म्हणूनच या स्पेक्स आणि फिचर्सवर पूर्णपणे विश्वास ठेवणे योग्य होणार नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.