Tech News : आता स्मार्टफोन सारखाच स्मार्ट चश्मा, बटन दाबताच ऐकू येणार गाणी

Skyraptor Launch : स्मार्ट गॉगल खरेदी करण्यासाठी तुम्हाला आता जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही आहे.
Tech News
Tech News Saam Tv

Skyraptor Shades : स्मार्ट गॉगल खरेदी करण्यासाठी तुम्हाला आता जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही आहे. गॅजेट्स बनवणाऱ्या पॉप्युलर ब्रँड जस्ट कोर्सेकाने आत्ताच किफायती स्मार्ट ग्लासच्या अनुसंगे skyraptor लॉन्च केले आहे.

तुम्हीसुद्धा युनिक सनग्लासेस खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर, तुमच्यासाठी हा एक चांगला ऑप्शन आहे. दोन हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या या चष्म्यामध्ये अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. हा स्मार्ट चष्मा तुमची अनेक कामे सोपी करून टाकेल.

सोबतच हा चष्मा खरेदी केल्यानंतर तुम्हाला इयरबड्स आणि नेकबँडवर वेगळे पैसे (Money) खर्च करावे लागणार नाही आहेत. तुम्ही या चष्म्याचा वापर मोबाईल फोनला हात न लावता कॉलिंगची मजा घेऊ शकता.

Tech News
Tech News : ग्राहकांसाठी Apple ची भेट! एक नाही तर तीन गोष्टी एकाचवेळी होणार चार्ज

सर्वात आधी जाणून घ्या या बॉक्समध्ये काय काय मिळणार आहे -

हा स्मार्ट चष्मा सामान्य चष्म्यासारख्या बॉक्समध्ये येतो. बॉक्सच्या फ्रंटला ग्लासच्या फोटोसह कंपनीचे ब्रँड लेबल देखील दिसते. सोबतच बॉक्समागे काही बेसिक डिटेल्स बद्दल माहिती दिली गेली आहे.

जसे किंमत, कस्टमर केअर (Care) टोल फ्री नंबर, फीचर्स. बॉक्स ओपन केल्याबरोबर तुम्हाला सर्वात आधी चष्मा दिसेल. दिसायला अगदी सामान्य सनग्लासेस सारखा हा चष्मा कामाच्या बाबतीत अगदी वेगळा आहे. चष्म्या ऐवजी बॉक्समध्ये चार्जिंग लेबल आणि युजर मॅन्युअल गाईड सुद्धा मिळते.

Skyraptor Shades
Skyraptor ShadesCanva

डीजाईन आणि बिल्ड क्वालिटी -

कंपनीने skyraptor ला wayfarer ची डिझाईन दिली आहे, जी आधीपासूनच ट्रेण्डमध्ये आहे. की डिजाइन सर्व प्रकारच्या चेहऱ्यावर सूट करते. पण तुमचा चेहरा जर छोटा असेल तर हा चष्मा तुमच्या चेहऱ्यावर थोडा मोठा वाटू शकतो. पण तुमचा चेहरा जर मोठा असेल तर, हा स्मार्ट चष्मा तुमच्या चेहऱ्यावर अतिशय सुंदर दिसेल.

स्कायरेप्टरची फ्रेम लाईटवेट आहे आणि एबीएस प्लास्टिक पासून बनली गेली आहे. स्पीकर्स, मायक्रोफोन आणि बॅटरी असून सुद्धा चष्म्याचे वजन चाळीस ग्रॅम पेक्षा कमी आहे. सुरुवातीला तुम्हाला असे वाटू शकते की, हा चष्मा हलका कॉलिटी च्या प्लास्टिक पासून बनला गेला आहे.

परंतु असे अजिबात नाही आहे. चष्मा लाईटवेट जरी असला तरी तो मजबूत आहे. तुम्ही या चष्म्यासोबत अतिशय कंफर्टेबल राहू शकता. सोबतच हा चष्मा घातल्यानंतर तुमच्या कानांना दुखणार नाही.

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही या चष्म्याचा वापर कोणत्याही ऋतूमध्ये करू शकता. तुम्हाला कळलेच असेल की हा चष्मा वॉटरप्रूफ आहे. हा चष्मा वॉटरप्रूफ असून स्वीटप्रूफ सुद्धा आहे. या चष्म्याची ग्लास क्वालिटी अतिशय चांगली आहे.

Tech News
Tech News : आता WhatsApp वरुन पाठवलेल्या फोटोंना लावता येणार पासवर्ड, जाणून घ्या
Skyraptor Shades
Skyraptor ShadesCanva

कशा पद्धतीने काम करते?

हा चष्मा वापरणे अतिशय सोपे आहे. चष्म्याच्या राईट टेम्पल वरती तीन बटन आहेत. ज्यामध्ये पॉवर बटन आणि वोल्युम बटन उपलब्ध आहे. तुम्हाला हे बटन ऑन करायचे आहे आणि ब्लूटूथ कनेक्ट करून वापरायचे आहे.

सोबतच तुम्ही याच्यासम्यासोबत कॉलिंग आणि म्युझिकची मजा घेऊ शकता. कॉल आल्यानंतर पॉवर बटनवर क्लिक करून कॉल रिसीव करू शकता आणि फोनवर बोलून झाल्यानंतर पुन्हा पॉवर बटन दाबून फोन बंद करू शकता.

फोन दरम्यान आवाज कमी जास्त करायचं असेल तर, सिम्पल वरती दिलेल्या प्लस आणि मायनसच्या बटनावर लॉन्ग प्रेस करून वोल्युम कमी जास्त करू शकता. सोबतच गाणी ऐकण्यासाठी तुम्ही या बटनांचा वापर करू शकता. सोबतच या चष्म्यामधील साऊंड सिस्टम अतिशय दमदार आहे. या दशम्यामध्ये 0.6W चा स्पीकर दिला गेला आहे.

बॅटरी बॅकअप सुद्धा दमदार आहे -

यामध्ये 120 एम ए एचची बिल्टइन बॅटरी दिली गेली आहे. जी दीर्घकाळ चालू शकते. यामध्ये मायक्रो यूएसबी चार्जिंग पोर्ट मिळते. या चष्म्याला चार्जिंग करण्यासाठी दोन तास लागतात. दोन तास व्यवस्थित चार्जिंग केल्यानंतर तुम्ही हा चष्मा पाच ते सहा तास आरामात वापरू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com