Free Travel : आता फ्रीमध्ये फिरा Hong kong, असा घ्या सुवर्णसंधीचा लाभ

Hong Kong Free Travel : तुम्हाला जर भारताबाहेर फ्री फिरण्याची संधी मिळाली तर तुम्ही ती नक्कीच सोडणार नाही.
Free Travel
Free TravelSaam Tv

Travel Free : तुम्हाला जर भारताबाहेर फ्री फिरण्याची संधी मिळाली तर तुम्ही ती नक्कीच सोडणार नाही. कोरोणा काळानंतर जगभरातील अर्थव्यवस्था चांगली सुधारली आहे. भारतासह अनेक देशांनी पर्यटनस्थळे सुरू केली आहेत आणि हाँग काँग पुन्हा एकदा पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहे.

यासाठी हाँग काँग घरातील (Home) पर्यटकांना आणि विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एक विशेष प्रदर्शन करत आहे. हाँग काँग टुरिझमने 'हॅलो हॉंगकॉंग' नावाने एक ऑफर लाँच केली आहे. घरातील आणि विदेशी एअरलाइन्स पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेळेवर वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स (Offers) दिल्या जातात.

Free Travel
Travel Knowledge : गोवा फिरायला जाताय? जाणून घ्या तेथील फेस्टिव्हलबद्दल

पाच लाख फ्री विमानाचे तिकीट आणि वाऊचर -

या ऑफरची खासियत म्हणजे यावेळी हॉंगकॉंग यात्रियांना आणि पर्यटकांना आपल्या देशाकडे आकर्षित करण्यासाठी अनेक गोष्टी करणार आहेत. हाँगकाँग पर्यटन बोर्ड तुम्हाला एक नाही दोन नाही तर तब्बल पाच लाख यात्रियांना हजारांहून अधिक फ्री विमानाचे तिकीट आणि वाउचर देणार आहेत.

पर्यटन विभागाने हा निर्णय पर्यटनाला बढावा देण्यासाठी घेतला आहे. हाँगकाँग पर्यटन विभाग शहराच्या यात्रेसाठी बंपर ऑफर घेऊन आला आहे. एका ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे की, हाँगकाँगमध्ये पर्यटनाला बढावा देण्यासाठी पर्यटन बोर्ड पाच लाख फ्री उड्डाण तिकीट देत आहे.

Free Travel
Taj Mahal Travel Tips : ताजमहलच्या सौंदर्यांने पर्यटकांच्या डोळे दिपले, अनेकांना पडतेय भूरळ !

कोविड यात्रा प्रतिबंधिंना बाजूला केलं गेलं -

हाँगकाँग पर्यटन बोर्डाचे कार्यकारी निदेशक डेन चेंग यांचं असं म्हणणं आहे की, एअरलाइन्सचे समर्थन करण्यासाठी फ्री तिकीट खरेदी केले होते. आताच्या घडीला कोरोना महामारी हळूहळू कमी होत चालली आहे.

कोरोना महामारीमुळे हॉंगकॉंग हे शहर अनेक वर्षांपासून बंद होते. अशातच विदेशी पर्यटक सुद्धा हॉंगकॉंग येथे जाण्यास घाबरत होते. याशिवाय हालाकीच्या महिन्यांमध्ये कोविड यात्रा प्रतिबंधांना बाजूला सारण्यात गेलं होत आणि मागील तीन वर्षांमध्ये पर्यटकांच्या कमीमुळे हाँगकाँग पर्यटन उद्योगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com