IRCTC Confirm Ticket Booking : आता तात्काळचं कन्फर्म तिकीट मिळणार एका क्लिकवर, जाणून घ्या प्रोसेस

Confirm Ticket Booking : तत्काळ तिकीट बुक करताना तपशील भरण्यासाठी अधिक वेळ लागतो.
IRCTC Confirm Ticket Booking
IRCTC Confirm Ticket BookingSaam Tv

Railways Confirm Ticket Booking : देशातील मोठी लोकसंख्या भारतीय रेल्वेने प्रवास करते. अशा परिस्थितीत कन्फर्म तिकीट बुक करण्यात लोकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. काही महिने अगोदर तिकीट बुक केल्यानंतरही कन्फर्म तिकिटांसाठी प्रतीक्षा करावी लागते.

दुसरीकडे, तात्काळ तिकीट बुक करताना तपशील भरण्यासाठी अधिक वेळ लागतो. अशा परिस्थितीत तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळणे कठीण होऊन बसते. मात्र, आता तुम्हाला काळजी (Care) करण्याची गरज नाही.

IRCTC Confirm Ticket Booking
IRCTC Alert : IRCTC चा जाहीर अलर्ट ! डुप्लिकेट अॅप्स आणि वेबसाइट्सपासून व्हा वेळीच सावध, नाहीतर होईल फसवणूक

येथे असा काही मार्ग आहे, ज्याद्वारे तुम्ही तत्काळ तिकीट लवकरच मिळवू शकता. अशा प्रकारे तिकीट बुक केल्याने, कन्फर्म होण्याची शक्यताही वाढते. ही एक छोटी प्रणाली आहे, ज्यामध्ये तुम्ही फक्त पेमेंट प्रक्रिया करून तात्काळ तिकीट बुक करू शकता. काय आहे ही संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया.

दीर्घ प्रक्रियेतून आराम मिळेल -

या पद्धतीमुळे तात्काळ तिकीट बुकिंगच्या दीर्घ प्रक्रियेपासून दिलासा मिळेल आणि तुमचे तिकीट कमी वेळेत बुक होईल. या पद्धतीच्या मदतीने तुम्ही प्रवाशांचे तपशील आगाऊ भरू शकता, ज्यामुळे तुम्हाला तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी कमी वेळ (Time) लागेल.

IRCTC Confirm Ticket Booking
Indian Railway IRCTC App : तिकीट बुक करताना IRCTC अॅपवर अकाउंट कसे बनवाल ? प्रोसेससाठी फॉलो करा स्टेप-बाय-स्टेप

तत्काळ तिकीट लवकर कसे बुक करावे -

तात्काळ तिकीट बुक करण्यापूर्वी तुम्हाला पासवर्ड आणि यूजर आयडीसह IRCTC वेबसाइटवर (Website) लॉग इन करावे लागेल. यानंतर माय अकाऊंट विभागात जा आणि प्रवासाचा तपशील आणि प्रवासी आगाऊ भरा. जेणेकरून जेव्हा तत्काळ तिकीट बुकिंगची वेळ येईल तेव्हा तुम्हाला हे तपशील भरावे लागणार नाहीत. खिडकी उघडताच तात्काळ तिकीट बुक करणे सुरू करा. तपशील निवडल्यानंतर, आता पेमेंटसाठी (Payment) पुढे जा. पेमेंट होताच तुमचे तिकीट बुक केले जाईल.

या क्लाससाठी तत्काळ बुकिंग केले जात नाही -

रेल्वे फर्स्ट एसी आणि एक्झिक्युटिव्ह क्लास वगळता सर्व वर्गातील प्रवाशांना तिकीट बुकिंगची सुविधा देते. तात्काळ तिकीट बुकिंग एक दिवस अगोदर नॉन एसी क्लाससाठी सकाळी 10 वाजता आणि एसी, स्लीपर आणि इतरांसाठी सकाळी 11 वाजता केली जाते. IRCTC च्या एकाच यूजर आयडीवरून दोन तात्काळ तिकिटे बुक करता येतात.

IRCTC Confirm Ticket Booking
Puneri Patya | पुणेरी पाट्या कोणी सुरू केल्या? पाहूयात या मागची कहाणी

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com