Daryadari Food Festival : ओ नाखवा बोटीन जेवाल का?... ‘दर्यादारी फूड फेस्टिव्हल’मध्ये खवय्यांसाठी पर्वणी

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात आगरी समाजाची लोकसंख्या मोठी आहे.
Daryadari Food Festival
Daryadari Food Festival Saam Tv

Daryadari Food Festival : मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात आगरी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. मुळात समुद्राच्या जवळ राहत असल्याने आगरी माणसांना मासळी अधिक प्रिय म्हणून ते समुद्रात जाऊन मासे पकडतात. या आगरी समाजाच्या मालकीचे भाताचे आगार, मिठाचे आगर असल्याने हा समाज आगरी म्हणून ओळखला जाऊ लागला.

आगरी माणसं आणि त्यांचा आदरतिथ्य जगजाहिर आहेत, हाच आदरतिथ्य आपण सेवेच्या माध्यमातून द्यावा यासाठी ठाण्यातील स्थापत्य इंजीनियर (Engineer) असलेले सर्वेश तरे यांनी ‘ओ नाखवा बोटीन जेवाल का?’ म्हणत 19 जानेवारी 2022 रोजी ‘दर्यादारीचे’ आमदार राजु पाटील,बिगबॉस फेम दादुस आणि तसेच टाईमपास मुव्ही फेम जयेश चौधरी यांच्या हस्ते धुमधडाक्यात उद्घाटन केले होते.

खर तर सर्वेश यांच्या आईंना लोकांना जेवन करून घालणं फार आवडत असत परंतू कोरोना (Corona) काळात आई गेल्या नंतर आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वेश तरे यांनी आपल्या आईंचा हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी 2022 मध्ये हे पाऊल उचलले आणि आता 2023 मध्ये वर्षपुर्तीनिमीत्त ‘दर्यादारी फुड फेस्टिव्हल’साजरा करतायत.

Daryadari Food Festival
Most Expensive Foods : अतिशय चविष्ट पण तितकचं महागड, नेमक काय आहे या पदार्थात ?

वर्षभरात चांगल्या वाईट अनुभवात दर्यादारीचा व्हरका गुगलवर 5 पैकी थाटात 4.5 मानांकन घेऊन किनाऱ्यावर जोरात चालू आहे. या वर्षभरात त्यांच्या सेवेत आगरी मेजवाणीसह फ्युजन पदार्थ आणि पाच विविध मास्टर्स शेफ्सना घेऊन मेनूमध्ये आपल्या भन्नाट स्वादिष्ट अशा रेसीपी त्यांनी तयार केल्या आहेत.

दर्यादारी उपहारगृहात पारंपारिक मेजवाणीसह इन्डोचायनीज अन् भारतीय खाद्यपदार्थांची सुध्दा मेजवाणी उपलब्ध आहे. 19 जानेवारीला दर्यादारी हॉटेलला 1 वर्ष पुर्ण झाले असुन वर्षपुर्तीनिमीत्त सर्वेश तरे यांनी खव्वयांसाठी ‘दर्यादारी फुड फेस्टीवल’ साजरा करतायत. 19 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान असलेल्या खाद्य महोत्सवात खव्वयांना 149 रू पासून मासळी थाळी ते 4 हजारांपर्यंत विविध थाळ्या उपलब्ध आहेत.

Daryadari Food Festival
Comfort Food : पुरुष आनंदात असताना पिझ्झा खातात, महिला तणावात असताना काय खातात हे जाणून घ्या

70 रुपयांपासून कोलबी, सुरमई बिर्याणीसुध्दा उपलब्ध आहे. चिंबोरी-कोलबी, चिकन लॉलीपॉप सह पोपटीसुध्दा आहेच.

सर्वेश तरे यांचे ठाम मत आहे हॉटेलमध्ये फक्त जेवायचं नसतं तर जेवण अनुभवायचं असत. असं म्हणत होडीत असलेल्या या ठाण्यातील हॉटेलमध्ये सर्वेश तरे यांनी सारे खव्वयांनी प्रथम होणाऱ्या या फुड फेस्टिव्हलसाठी भेट द्या असे आमंत्रित केले आहे.

सर्वेश तरे यांच्या मते जागो जागी बर्गर पिझ्झाच्या जागतिकीकरणच्या या जमान्यात पुढे चुलीवरची आगरी भाकरीचा वारसा चालू राहो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com