भेंडीमुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण! Diabetes असणाऱ्यांनी रोज सकाळी करा 'ही' गोष्ट

भेंडीमध्ये फायदेशीर घटक आढळतात. तुम्हाला माहित आहे का की भेंडीचे पाणी देखील आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. भेंडीचे पाणी शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित करण्याचे काम करते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Okra
OkraSaam Tv

Diabetes Control: सध्या उन्हाळा सुरू आहे आणि या ऋतूमध्ये लोकांना अशा गोष्टी खायला आवडतात ज्यात भरपूर पाणी आणि शरीरासाठी आवश्यक पोषक घटक असतात. भेंडीमध्येही असेच फायदेशीर घटक आढळतात. तुम्हाला माहित आहे का की भेंडीचे पाणी देखील आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. भेंडीचे पाणी शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित करण्याचे काम करते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (Okra For Diabetes Control)

भेंडी शरीरासाठी किती फायदेशीर?

भिंडीमध्ये शरीराला लाभदायक पोषक तत्व असतात. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन-बी6 आणि फोलेट भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन-बी मधुमेह न्यूरोपॅथीच्या प्रगतीस प्रतिबंध करते आणि शरीरात मधुमेहाचे प्रमुख कारण मानल्या जाणार्‍या होमोसिस्टीनची पातळी कमी करण्यास मदत करते. तसेच, भेंडीमध्ये पाण्यात विरघळणारे फायबर आढळते जे शरीरात साखर स्थिर ठेवत असते.

Okra
उन्हाळ्यातही सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय? हे उपाय करून पाहा...

रक्तातील साखर कशी नियंत्रित केली जाते?
भेंडीमध्ये कॅलरीज कमी असतातच, पण ते पाण्यामध्ये विरघळणारे आणि अघुलनशील फायबरचाही एक चांगला स्रोत आहेत. या घटकामुळे, शरीरात फायबरचे हळू हळू उशिरा विघटन होते आणि रक्तामध्ये साखर खूप हळूहळू सोडली जाते. याच कारणामुळे भेंडी शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते.

याशिवाय भेंडीचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) देखील खूप कमी असते. हे सिद्ध झाले आहे की कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या गोष्टी आपल्या रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar level) नियंत्रित ठेवतात. 'अमेरिकन डायबिटीज असोसिएशन' देखील लेडीफिंगरला मधुमेही रुग्णांसाठी अतिशय चांगला पर्याय मानते.

Okra
WhatsApp Group Call वर आता 32 लोक एकाच वेळी बोलू शकणार! जाणून घ्या नवीन फीचरबद्दल

भिंडीचे पाणी कसे तयार करावे?

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भेंडीच्या पाण्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते. यासाठी प्रथम 5-6 लेडी फिंगर घ्या आणि त्यांना चांगले धुवा. यानंतर, सुरीच्या साहाय्याने, भिंडीचे दोन लांब भाग करा. भिंडीचे कापलेले तुकडे एका भांड्यात रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाण्यात पिळून घ्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com