Ola electric scooter | 24 तासांत एक लाखांपेक्षा जास्त गाड्या बुक

Ola कंपनी आपली पहिली इलेक्ट्रीक स्कुटर बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी ऑनलाईन बुकिंग चालू झाले आहे.
Ola electric scooter | 24 तासांत एक लाखांपेक्षा जास्त गाड्या बुक
Ola electric scooter | 24 तासांत एक लाखांपेक्षा जास्त गाड्या बुकtwitter/@OlaElectric

पेट्रोलने शंभरी पार केल्यापासून इलेक्ट्रीक वाहनांची जास्त चर्चा होऊ लागली आहे. अशातच अनेकांचा कल आता इलेक्ट्रीक गाड्याकडे वळतोय. अशातच ओला कंपनी आपली पहिली इलेक्ट्रीक स्कुटर Ola electric scooter बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी ऑनलाईन बुकिंग चालू झाले आहे. विशेष म्हणजे 24 तासांच्या आत एक लाखाहून अधिक गाड्या बुक झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. ola electric scooter got more than one lakh bookings in 24 hours

ओला कंपनीचे सहसंस्थापक भाविश अग्रवाल bhavish agrawal यांनी आपल्या ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. 499 रुपयांत या गाडीचे बुकिंग करता येते. book ola in 499 rupees हे बुकिंग केलेल्यांना गाडी घरपोच पोहोचवण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरुन या ईलेक्ट्रीक स्कूटरची बुकिंग करता येईल. भारतात सगळीकडेच पेट्रोलचे भाव शंभर रुपये प्रति लिटरच्या वर गेले आहेत. त्यामुळे आता दुचाकीवरुन प्रवास करणेही सामान्य माणसाला परवडत नाही. जवळच्या अंतरावर जाण्यासाठी आणि दैनंदिन दळणवळणासाठी बाईक हे परवडणारे वाहन होते. मात्र पेट्रोलची किंमत वाढल्याने आता बाईक वापरणे खर्चिक बनले आहे. यावर उपाय म्हणून ईलेक्ट्रीक बाईक एक नवा पर्याय ठरत आहे. प्रदुषणरहीत आणि पेट्रोल - डिझेलच्या तुलनेत ईलेक्ट्रीक बाईक परवडते. मात्र ईलेक्ट्रिक बाईकला अनेक मर्यादाही आहेत.

हे देखील पहा -

या गाडीची किंमत साधीरणतः एक लाखाच्या आसपास असण्याची शक्यता आहे. या गाडीचे संपूर्ण फीचर्स कंपनीने सांगितलेले नाही, मात्र ही गाडी एकदा चार्ज केल्यावर साधारणतः 100 किलोमीटर धावेल असं बोललं जातंय. शिवाय या गाडीचा बूट स्पेसही सर्वात मोठा असल्याचा दावा कंपनी करते. कंपनी या स्कूटरला भविष्यातून आलेली बाईक म्हणते.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com