Raksha Bandhan Special Recipe : रक्षाबंधनच्या दिवशी अशी बनवा बेसनापासून ही रेसिपी

Besan Barfi Recipe: आपल्या लाडक्या भावासाठी बनवा बेसनापासून ही खास रेसिपी.
Besan barfi, Food, Recipe, Rakshabandhan special recipe
Besan barfi, Food, Recipe, Rakshabandhan special recipeब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Raksha Bandhan special recipe :

श्रावण महिन्यातील दुसरा व आपल्या सगळ्याचा लाडका सण रक्षाबंधन. यंदा हा दिवस 30 ऑगस्ट 2023 रोजी साजरा करण्यात येणार आहे.

हे देखील पहा -

राखी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करुन देणारा दिवस. आपल्या भावाने आपले रक्षण करावे ही यामागची प्रार्थना असते. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. या दिवशी गोडाधोडाचे जेवण केले जाते व त्याचा आस्वाद घेतला जातो. जाणून घेऊया रक्षाबंधनच्या दिवशी बेसनापासून रेसिपी कशी बनवायला हवी. शेफ पंकज भदौरिया यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेली एक झटपट आणि सोपी बेसन बर्फी रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहीले आहे हा घ्या एक द्रुत रक्षाबंधन स्पेशल मिठाई! फक्त १० मिनिटांत बेसन की बर्फी!'. आता तिने ते कसे बनवले ते जाणून घेऊया.

बेसनाची बर्फी

साहित्य -

बेसनाचे पीठ - १ १/२ कप

शुध्द तूप - १/२ वाटी

पिठीसाखर - १/२ वाटी

बटर पेपर - १

तेल व पाणी - आवश्यकतेनुसार

ड्रायफ्रुट्स - आवश्यकतेनुसार

कृती -

बेसनाची बर्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम बेसन चाळून घ्या. त्यानंतर कढईत तूप गरम करुन बेसन पीठ त्यात लालसर होईपर्यंत भाजून घ्या. भाजून झाल्यानंतर त्यात पिठीसाखर घालून मिश्रण चांगले एकजीव करा. त्यात पुन्हा दोन चमचे साखर (Sugar) व पाणी (Water) घालून मिश्रणाला उकळी येऊ द्या. त्यानंतर मोठी प्लेट बटर पेपर लावून त्यावर थोडे तेल पसरवून घ्या. त्यात तयार मिश्रण घालून पसरवा वरुन ड्रायफ्रुट्स घालून त्याच्या वड्या पाडा. तयार होईल आपली बेसनाची बर्फी.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com