Benefits of Banana : दिवसभराच्या ऊर्जेसाठी रोज एक केळी ठरेल फायदेशीर

केळी ही कोणत्याही मोसमात कुठेही मिळणारे फळ आहे.
Benefits of banana, Health issue
Benefits of banana, Health issue ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : केळी ही कोणत्याही मोसमात कुठेही मिळणारे फळ आहे. रोज एक केळी खाल्ल्यास शरीर निरोगी राहण्यास मदत होते. केळी खाल्ल्यामुळे रोजच्या कार्बोहायड्रेटच्या एका भागाची पूर्तता होते.

हे देखील पहा -

केळी हे आरोग्यवर्धक फळ असून ते बाजारात सहज मिळणारे फळ आहे. केळीमध्ये जीवनसत्त्व क व ब-६, डायटरी फायबर आणि मँगनीज भरपूर प्रमाणात मिळते. केळी फॅट फ्री व कोलेस्ट्रॉल फ्री मानली जाते. केळीचे सेवन केल्यास आपल्याला दिवसभर ऊर्जा प्राप्त होते. दिवसभर केळी खाल्ल्याने आपल्याला फायदा कसा होईल हे जाणून घेऊया.

१. केळी जीवनसत्त्व, पोटॅशियम, फॉस्फरसारख्या मिनरल्स यांचा समृध्द असा खजिना आहे. हे नियमित खाल्ल्याने ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल व हृदयरोग पिडीतांना याचा फायदा होतो. यामुळे रक्तप्रवाह देखील सुरळीत होते. उच्च रक्तदाब व हृदयरोगाचा धोका कमी होतो.

Benefits of banana, Health issue
Benefits of walking: नियमित चालल्याने शरीराला होतील अनेक फायदे!

२. केळीमध्ये असणारे अँटीऑक्सीडेंट्स आपल्याला रक्तात व्हाइट ब्लडसेल्स विकसित करण्यास मदत करतात. व्हाइट ब्लडसेल्स आपली प्रतिकारशक्ती मजबूत करतात आणि अनेक आजारांपासून (Disease) संरक्षण करण्यास मदत करते.

३. केळात भरपूर कमी ग्लायसेमिक इंडेक्सचे स्टार्च असते. हे जेवणानंतर ब्लडशुगरची लेव्हल वाढू नये यासाठी कार्य करते. केळात असलेले पाण्यात विरघळणारे पॅक्टिन फायबर आणि स्टार्चही यात आहेत.

४. पिकलेल्या केळात डोपामाइन अँटीऑक्सीडेंट्स कंपाउंड मोठ्या प्रमाणात आढळते. जे उत्तम न्यूरोट्रान्समीटरचे काम करते. हे आपला मेंदू अधिक सक्रीय ठेवण्याचे काम करते.

५. फॉलिक अॅसिड आणि जीवनसत्त्व ब -६ (Vitamins) याचे परिपूर्ण स्त्रोत केळी आहे. अधिक थकवा किंवा ऊर्जा वाढवण्यासाठी केळीचे सेवन फायदेशीर असते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com