Smart Tv : One Plus Tv मिळतोय अवघ्या 10,000 किमतीत, 'या' ग्राहकांना विशेष सूट

या कंपनीचे प्रीमियम आणि नॉन-प्रिमियम स्मार्ट टीव्ही 40 टक्क्यांपर्यंत सूट आणि बँक ऑफरसह उपलब्ध आहेत.
Smart Tv
Smart TvSaam Tv

Smart Tv : दिवाळी धमाका संपल्यानंतरही काही विशिष्ट साइट्स आपल्या ग्राहकांना विशेष सवलतींमध्ये वस्तू देतात. त्यातील सगळ्यात महत्त्वाची व लोकप्रिय अशी शॉपिंग प्लॅटफॉर्म साइट्स Amazon.

Amazon वर लोकप्रिय टेक कंपनी OnePlus चे स्मार्ट टीव्ही अतिशय कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे. या कंपनीचे प्रीमियम आणि नॉन-प्रिमियम स्मार्ट टीव्ही 40 टक्क्यांपर्यंत सूट आणि बँक ऑफरसह उपलब्ध आहेत. या सवलतीच्या ऑफरसह, तुम्ही OnePlus स्मार्ट टीव्ही रु. 10,000 पेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.

OnePlus कडे भारतात स्मार्ट टीव्हीची मोठी लाइनअप आहे, ज्यामध्ये Y1, Y1S, Y1S Pro, U1S, Q1 आणि Q1 Pro टीव्ही मॉडेल्सचा समावेश आहे आणि सर्व प्रीमियम वैशिष्ट्यांसह येतात. बेझल-लेस डिझाइनसह या सर्व मॉडेल्सवर सवलत मिळत आहे, परंतु तुम्ही 32-इंच स्क्रीनसह Y1 मॉडेल सर्व ऑफरसह अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकाल.

Smart Tv
Tech News: तुमचा मोबाईल हॅक झाल्यास देतो काही सिग्नल्स, ते कसे ओळखाल?

सर्वात मोठ्या सवलतीत असा टीव्ही खरेदी करा

OnePlus 32 इंच Y Series HD Ready Smart Android TV 32Y1 ची किंमत 19,999 रुपये आहे परंतु 30 टक्के डिस्काउंटनंतर तो 13,999 रुपयांना लिस्ट झाला आहे. OneCard क्रेडिट कार्डच्या मदतीने पेमेंटवर 10 टक्के सूट मिळेल. Amazon Pay Later किंवा Amazon Pay ICICI क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास सवलत कॅशबॅक उपलब्ध आहेत.

अॅमेझॉनचा दावा आहे की सर्व बँक ऑफरसह, हा स्मार्ट टीव्ही 9,849 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केला जाऊ शकतो, जो त्याच्या मूळ किमतीच्या निम्म्यापेक्षा कमी आहे. यासोबतच हा टीव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोफत इन्स्टॉलेशनचा लाभही कंपनीकडून दिला जात आहे.

Smart Tv
Tech News: सिमकार्ड घेताना 'ही' चूक करु नका; अन्यथा व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम वापरल्यास जाल तुरुंगात

अशी आहेत वनप्लस स्मार्ट टीव्हीची वैशिष्ट्ये

  • बेझल-लेस डिझाइनसह टीव्हीचा 32-इंचाचा डिस्प्ले HD रिझोल्यूशन आणि 93 टक्के कलर गॅमटसह येतो.

  • यात अंगभूत क्रोमकास्ट आणि गुगल असिस्टंट सपोर्ट सारखी स्मार्ट वैशिष्ट्ये आहेत आणि ते Android TV सॉफ्टवेअरवर चालतात.

  • टीव्ही नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि YouTube सारख्या अॅप्ससह पूर्व-इंस्टॉल केलेला आहे आणि 64-बिट प्रोसेसर यात मिळत आहे.

  • ऑडिओ अनुभवासाठी, यात डॉल्बी ऑडिओ सपोर्टसह 20W ड्युअल स्पीकर आहेत.

  • कनेक्टिव्हिटीसाठी, अंगभूत WiFi व्यतिरिक्त, या टीव्हीमध्ये (TV) दोन HDMI पोर्ट आणि दोन USB पोर्ट आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com