गूळाचे अतिसेवन ठरु शकते, आरोग्यास हानिकारक

उन्हाळ्यात गुळाचे सेवन करताना या गोष्टींची काळजी घ्या.
गूळाचे अतिसेवन ठरु शकते, आरोग्यास हानिकारक
Jaggery advantage and disadvantage in Marathi, Summer Health Tips in Marathi, jaggery benefits in Marathi, jaggery disadvantagesब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सणासुदीला, गोड करताना किंवा रोजच्या आहारात हल्ली गुळाचे प्रमाण वाढले आहे. मधुमेह (Diabetes) असणारे व्यक्ती देखील गुळाचे सेवन अधिक प्रमाणात करतात. परंतु, गूळ आरोग्यासाठी जितका चांगला मानला जातो तितकाच तो हानिकारक देखील आहे. गुळाच्या अतिसेवनाने शरीरावर त्याचे दुष्परिणाम देखील होतात. गुळात अधिक उष्णता असते. याच्या सेवनाने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. त्यामुळेच अँनिमियाच्या रुग्णांना गूळ खाण्याचा सल्ला देखील दिला जातो. शरीराला ऊर्जा देण्यासोबतच गुळात शरीरातील चयापचय क्रियाही मजबूत करण्याचे गुणधर्म आहेत. गूळही आरोग्यासाठी तितकाच चांगला आहे परंतु, याचे अतिसेवन केल्याने जास्त नुकसान होते. (Jaggery advantage and disadvantage in Marathi)

हे देखील पहा -

गुळाची चव गरम असल्यामुळे उन्हाळ्यात जास्त गूळ खाणे टाळावे. अन्यथा, पोटाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. याशिवाय अनेक गैरसोयींनाही सामोरे जावे लागू शकते, अशा परिस्थितीत गुळाचे सेवन केल्याने शरीराला कसे नुकसान होऊ शकते, चला जाणून घेऊया.

गुळाचे अतिसेवन केल्यास कसे नुकसान होऊ शकते.

१. उन्हाळ्यात जास्त गुळाचे सेवन केले तर उष्णतेच्या प्रभावामुळे नाकातून रक्त येण्याची समस्या होऊ शकते. तसेच पोटात जंत होण्याचीही शक्यता असते.

२. उन्हाळ्यात जास्त गूळ (Jaggery) खाल्ल्याने अपचन आणि पोट खराब होऊ शकते. याशिवाय जुलाब देखील होऊ शकतो.

Jaggery advantage and disadvantage in Marathi, Summer Health Tips in Marathi, jaggery benefits in Marathi, jaggery disadvantages
Butter milk tips : ताक खरंच शरीरासाठी 'चांगलं' आहे का?

३. साखरेपेक्षा गुळ चांगला मानला जातो. काही लोक आपले वजन कमी (Weight loss) करण्यासाठी साखरेऐवजी गुळाचे सेवन करतात, परंतु जास्त प्रमाणात गूळ खाल्ल्याने वजन खूप वेगाने वाढू शकते.

४. जास्त प्रमाणात गुळ खाल्ल्याने शरीराला सूज येते. गुळात असलेले सुक्रोज शरीरातील दाह आणखी वाढवू शकते.

५. गुळाचे अतिसेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढते.

डिस्क्लेमर: गुळाचे आहारात सेवन करताना नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.