
Recipe Of Papai Halwa : सुदृढ आणि निरोगी शरीर मिळवण्यासाठी तुम्हाला एक योग्य डायटप्लान ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. हेल्दी डायट केल्याने तुम्ही अनेक आजारांपासून वाचू शकता. तुम्ही जंक फूडशिवाय फळे आणि भाज्यांपासून अनेक स्वादिष्ट व्यंजने बनवू शकता.
आज आम्ही तुम्हाला पपई पासून हलवा कसा बनवावा आणि त्याचे कोणते फायदे आहेत हे सांगणार आहोत. पपईचा हलवा चवीला अतिशय उत्कृष्ट असतो. सोबतच पपईचा हलवा आपल्या आरोग्यासाठी (Health) अत्यंत फायदेशीर असतो. आईच्या हलव्यामध्ये विटामिन ए, प्रोटीन, आयरन, फॉस्फरस, कॅल्शियम अशा प्रकारचे विविध पोषकतत्वे उपलब्ध असतात.
इम्युनिटी सिस्टम मजबूत बनवतो -
पपईमध्ये व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. जे इम्युनिटी स्ट्रॉंग करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. अशातच तुम्ही पपई आणि गुळ मिक्स करून त्याचा हलवा बनवून खाऊ शकता. ज्यामुळे तुम्ही अनेक प्रकारच्या संक्रमणापासून वाचू शकता.
वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर -
पपईमध्ये भरपूर प्रमाणात फायबर उपलब्ध असते. हे वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर (Benefits) ठरते. तुम्ही तुमच्या वेट लॉस डायटमध्ये पपईचा हलवा शामील करू शकता.
पपईचा हलवा चविला उत्कृष्ट असल्या सोबत आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. पपईचा हलवा किंवा पपई खाल्ल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि तुम्ही वारंवार खाण्यापासून वाचता. सोबतच पपईचे सेवन केल्याने तुम्ही कफच्या समस्येपासून वाचू शकता.
अशा पद्धतीने बनवा पपईचा हलवा -
सर्वात आधी पिकलेल्या पपईची साल काढून, छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्या.
त्यानंतर एक पॅन गॅसवरती ठेवून मध्ये एक चमचा तूप घाला.
त्यानंतर पपईच्या तुकड्यांना पॅनवरती टाकून स्मॅश करा आणि चांगले परतून घ्या.
आता यामध्ये गुळ आणि दूध मिक्स करा.
हे मिश्रण चांगल्या प्रकारे फेटून घ्या.
सोबतच तुम्ही ही डिश ड्रायफ्रूटने गार्निश करू शकता.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.