Parenting Tips : बालरोगतज्ज्ञांकडे जाताना चुकूनही या चुका करु नका, अन्यथा बाळाला होईल मोठे नुकसान

बालरोगतज्ज्ञांकडे जाताना या गोष्टी करणे टाळा.
Parenting tips, Health tips
Parenting tips, Health tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Parenting tips : नवजात बाळ जन्माला आल्यानंतर आपण त्याची व्यवस्थित काळजी घेत असतो. परंतु, काही वेळेस बाळाला होणारे आजार सामान्य असले तरी पालकांना ते समजत नाही अशावेळी ते बालरोगतज्ज्ञांकडे जाण्याचा सल्ला घेतात.

हे देखील पहा -

पालक मुलांचा विचार करताना ते भारावून जातात ही बाब सामान्य आहे. पालक नेहमी चांगल्या गोष्टी करण्याच्या मार्गावर असतात परंतु, ते ज्या चुका करत असतात त्यापासून ते स्वत: अनभिज्ञ असतात. बालरोगतज्ञांच्या भेटीदरम्यान, पालक त्यांच्या मुलांच्या आरोग्यासाठी पूर्णपणे घाबरून अनेक चुका करतात. तथापि, या चुका जाणून घेणे महत्वाचे आहे जेणेकरुन उपचार प्रक्रियेवर त्याचा परिणाम होणार नाही जी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्वाचे आहे.

१. आपण डॉक्टरांना भेट देता तेव्हा पहिला आणि सर्वात महत्वाचा नियम आहे. आपल्या भीतीवर मात करुन डॉक्टरांवर विश्वास ठेवणे. याचा फायदा असा होतो की, शांत डोक्याने विचार केल्यास बाळामध्ये होणारे नेमके बदल किंवा त्याला होणारा त्रास आपण डॉक्टरांना सविस्तर रित्या सांगू शकतो.

Parenting tips, Health tips
Breakfast idea for diabetics : रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची आहे ? मधुमेहाने ग्रस्त आहात ? कोणते पदार्थ आहारात घ्यायला हवे जाणून घ्या

२. अनेकदा मुल रडायला लागलेल की, पालकांना लाज वाटू लागते. पालक त्यांना अशावेळी ओरडून गप्प करण्याचा प्रयत्न करतात. असे चुकूनही करु नका. बाळाला होणाऱ्या वेदाना ह्या रडू व्यक्त करण्याचा एकमेव मार्ग त्यांच्याकडे असतो. बाळ का रडत आहे हे डॉक्टरांना तपासू द्या.

३. डॉक्टरांना भेट देण्यापूर्वी बाळाला होणारा त्रास समजून एका कागदावर लिहून घ्या. बाळाच्या आरोग्याबद्दल डॉक्टरांना पालक म्हणून आपल्याला सांगायचे असते त्यासाठी आपल्या बाळाविषयी असणारी सगळी नोंद डॉक्टरांना सांगणे आवश्यक आहे.

४. डॉक्टरांनी (Doctor) आपल्याला पुन्हा येण्यास सांगितले असल्यास, भेटीची वेळ निश्चित करा आणि वेळेवर भेट द्या. आपल्या बाळात बदल जाणवू लागले असे वाटल्यास तेव्हा कोणतीही भेट चुकवू नका.

५. पालकांना (Parents) असे वाटते की, आपल्या मुलाच्या संसर्गासाठी शेजारच्या इतर मुलांना दोष देतात आणि त्यांना दोष देत काही मिनिटे जातात. अशा निरर्थक गोष्टी बोलण्याऐवजी, आपल्या डॉक्टरांना आपल्या मुलाची लक्षणे सांगा आणि योग्य वैद्यकीय मदत घ्या.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com