Parenting Tips : सोशल मीडियामुळे 'या' वयातील मुलांच्या मानिसकेतवर परिणाम, पालकांनी वेळीच द्यावे लक्ष !

पालकांनी मुलांच्या या गोष्टींवर वेळीच लक्ष द्या, अन्यथा...
Parenting Tips
Parenting TipsSaam Tv

Parenting Tips : हल्ली मोबाईल फोन व त्यात असणारे इंटरनेट प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. आजकालच्या डिजीटल युगात सोशल मीडिया वापरायला सगळ्यांना आवडते.

लहान मुलांपासून ते वयोवृध्दांना पर्यंत सर्वजण सोशल मीडियाच्या विळख्यात सापडले आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात, जिथे तुम्ही दूर आहात, तिथे सोशल मीडियाच्या मदतीने तुम्ही इतरांशीही कनेक्ट होऊ शकता. सोशल मीडियामुळे लोकांना एकमेकांशी जोडले जाते, तर सोशल मीडियाचे काही तोटेही आहेत, ज्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते.

जर आपण सोशल मीडियाच्या नुकसानाबद्दल बोललो तर ते सर्व वयोगटातील लोकांचे नुकसान करते, परंतु सर्वात जास्त नुकसान वाढत्या मुलांचे म्हणजेच किशोरवयीन मुलांचे (Child) होते. सोशल मीडियाचे सर्वाधिक नुकसान किशोरवयीन मुलांवर झाले आहे. किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यावर सोशल मीडियाचा सर्वाधिक परिणाम होतो.

Parenting Tips
Child Care : तुमच्या बाळाची हाडे कमजोर आहेत? 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा, दूडूदूडू धावू लागतील !

लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी या उत्तम साधनामुळे कोणते वयोगट सर्वात जास्त प्रभावित झाले आहेत आणि सोशल मीडियामुळे आपल्या मुलांचे कोणते नुकसान होत आहे हे आपण पाहायला हवे.

१. किशोरवयीन म्हणजे काय ?

१५ ते १७ वर्षांच्या वाढत्या मुलांना किशोरवयीन मुले म्हटले जाते. हे असे वय आहे जिथे मुले समजू शकतात. या वयात आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर सर्वाधिक होतो.

२. मानसिकतेवर कसा होतो परिणाम

सोशल मीडिया तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. दिवस-रात्र ते याचा वापर करत असतात. सोशल मीडियाच्या दीर्घकाळ वापरामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. मोबाईल (Mobile) आणि लॅपटॉपवर दिवसाचा जास्त वेळ घालवल्यामुळे मुलांमध्ये खेळणे, वाचणे आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे कमी होऊ लागले आहे. त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर दिसून येतो.

३. झोपेची कमतरता

Parenting Tips
Bad Habits of Kids : तुमचे मूल वाईट संगतीत आहे ? तर 'या' टिप्सचा वापर करा

लहान मुलांमध्ये, सोशल मीडियाचा सर्वात नकारात्मक परिणाम त्यांच्या आरोग्यावर दिसून आला आहे. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे मुले कमी झोपू लागली आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष आणि शारीरिक हालचालींचा अभाव आहे, ज्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य बिघडत आहे.

४. नात्यांवर परिणाम

सोशल मीडिया हे संपर्क टिकवून ठेवण्याचे एक चांगले साधन असले तरी, डिजिटली संपर्कात राहणे आणि आपल्या सभोवतालच्या लोकांशी समोरासमोर संपर्क राखणे यात खूप फरक आहे. असे लोक जे सोशल मीडियावर लोकांशी जास्त जोडलेले असतात, त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या लोकांशी बोलणे किंवा संपर्क राखणे कमी आवडते. त्यामुळे रिअल लाईफ रिलेशनशिपमध्ये दरारा पाहायला मिळतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com