Exam Stress Control : पालकांनो, परीक्षेच्या काळात मुलांना ताण येतोय? अशी घ्याल काळजी

Exam Months : फेब्रुवारी आणि मार्च हे महिने विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे असतात.
Exam Stress Control
Exam Stress ControlSaam Tv

Parenting Tips : फेब्रुवारी आणि मार्च हे महिने विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे असतात. अशातच बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा सुरू झाली असून, अनेक विद्यार्थी होम एक्झामिनेशन देखील पार पाडत आहेत. अशावेळी अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेचा तणाव आलेला असतो. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याला समजून घेणे अतिशय गरजेचे असते.

पाल्यासोबत पालकांनी (Parents) स्वतःचे डोके शांत ठेवून आपल्या पाल्याशी संवाद साधला पाहिजे. जर तुम्ही स्वतः स्ट्रेसमध्ये असाल तर, त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. अशातच तुमचा मुलगा किंवा मुलगी परीरीक्षेमुळे स्ट्रेसमध्ये असतील तर, अशा पद्धतीने त्यांची मदत करा.

Exam Stress Control
Mental Stress : बुद्धिबळ व फुटबॉल खेळल्यानेही तणाव कमी होतो का ? जाणून घ्या, काय म्हणते संशोधन

तणाव वाढवू नका -

मुलं त्यांच्या अभ्यासाला आणि परीक्षेला घेऊन आधीच तनवामध्ये असतात. अशा वेळी त्यांच्यावर परीक्षेच (Exam) बर्डन टाकण्याऐवजी त्यांची मदत करा. मुलांना अभ्यास आणि एक्झाम प्रेपरेशनबद्दल प्रश्न विचारन्याऐवजी अभ्यासामध्ये त्यांची मदत करा. त्यांना उत्तरे कशा पद्धतीने लक्षात ठेवायची याबद्दल थोडं गाईड करा.

तुमच्या मुलांसोबत संवाद साधा -

जर तुम्ही कामाकाजाचे व्यक्ती असाल तर, दुर्लक्ष न करता तुम्ही तुमच्या मुलांसाठी वेळ काढला पाहिजे. तुमचं मूल एकटेच अभ्यास करत बसले आहे हे गरजेचे नाही. असं ही असू शकतं की, परीक्षेच्या तणावामुळे त्याचं मन कोणत्याही गोष्टीमध्ये लागत नाहीये.

वेळात वेळ काढून तुम्ही तुमच्या पाल्याबरोबर संवाद साधला पाहिजे. तुम्ही त्याला या गोष्टीची खात्री करून देणे गरजेचे आहे की, टेन्शन घ्यायची काही गरज नाही तू तुझ्या परीक्षेमध्ये चांगला परफॉर्मन्स करू शकतोस.

अशा गोष्टी सांगितल्याने तुमच्या मुलाचे मनोबल वाढू शकते आणि त्याची परीक्षा देखील चांगली जाऊ शकते. त्यामुळे एक चंगला मित्र बनून तुम्ही तुमच्या मुलांना समजून घेतले पाहिजे आणि त्यांच्यावर परीक्षेचे, रिझल्टचं बर्डन नाही टाकले पाहिजे.

Exam Stress Control
MPSC Exam : पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं 14 तासंपासून आंदोलन सुरुच; राज्य सरकार काय भूमिका घेणार?

शांत राहायला शिकवा -

अनेक मुलं परीक्षे दरम्यान भरपूर ताण तणाव घेतात. अशावेळी तुम्ही त्यांना ब्रीदिंग एक्सरसाइज करण्याचा सल्ला द्या. ब्रीदिंग एक्सरसाइज केल्याने तुमच्या मुलांना उत्तरे लक्षात ठेवण्यासाठी मदत मिळेल. सोबतच त्यांची बुद्धी तल्लख होऊन त्यांचे माईंड फ्रेश राहील.

खानपानाकडे दुर्लक्ष करू नये -

परीक्षेदरम्यान तुम्ही तुमच्या पाल्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही त्यांचे डायट मेंटेन ठेवणे गरजेचे आहे. सोबतच तुम्ही त्यांना अशा गोष्टी खायला द्या ज्याने त्यांना ऊर्जा मिळेल आणि त्यांच्या शरीरातील सुस्तपणा दूर निघून जाईल.

फळे, भाज्या, काजू, बदाम, दूध, अंडे, स्प्राऊट्स अशा पदार्थांचे सेवन त्यांच्या डायटमध्ये असले पाहिजे. या पदार्थांचे नियमित सेवन केल्याने त्यांची मेंटल हेल्थ सुधारेल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com