Parenting Tips : तुमच्या वागण्याचा मुलांवर होऊ शकतो दुष्परिणाम

पालकांच्या वागण्यामुळे मुलांवर कशाप्रकारे परिणाम होतो.
Parenting Tips : तुमच्या वागण्याचा मुलांवर होऊ शकतो दुष्परिणाम
Parenting Tips in marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: आपल्या पाल्याला चांगले संस्कार आणि चांगल्या सवयी लावणे ही प्रत्येक पालकांची (Parents) सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. मुलं (Child) लहान असली तरी त्यांना योग्य-अयोग्य यातील फरक कळायला वेळ लागतो, त्यांच्या चुकीबद्दल त्यांना कसे वागवायचे ही जबाबदारी पालकांची असते. अनेकदा मुलांकडून अशा चुका होतात की पालकांच्या संयमाचा बांध फुटतो. अशा वेळी आपल्याला राग अनावर होत नाही. त्यामुळे आपण त्यांच्यावर हात उचलतो. हे चुकीचे आहे, यामुळे मुले आपला राग करू लागतात व आपल्यापासून दूरावतात.

हे देखील पहा -

सुट्टीत मुलांना ठेवा व्यस्त वाढणार नाही तुमचा ताणमुलं अती हट्टी आणि आक्रमक बनत असतील आणि मुलांच्या वागण्यात बदल होत असतील तर त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. त्यासाठी आपल्याला आपल्या पालकत्वाच्या शैलीकडे लक्ष द्यावे लागेल.

१. मुलांचे चुकत असल्याल त्यांना कोणत्याही प्रकारे मारु नका त्यामुळे त्यांना मानसिक दडपणा येईल व ते आपल्यापासून दूरावतील. मुलाशी ज्या पद्धतीने आपण वागतो त्याचे अनुकरण करुन मूल पुढे तसेच वागू लागते. त्यांचे वर्तन सुधारण्यासाठी गोष्टी शांतपणे हाताळा.

२. मुलाशी वागताना दुपट्टीचे वर्तन ठेवू नका. कधीही अशा प्रकारे वागू नका की, एका क्षणीला त्यांना तुमचा खूप राग येईल आणि दुसऱ्या क्षणी तुम्ही त्यांना काहीही करू द्याल. असे वागल्यास मुलांमध्ये संभ्रम निर्माण होतो. कोणत्याही परिस्थितीत त्याला कोणत्या प्रकारचे वर्तन करावे लागेल हे स्पष्टपणे सांगणे गरजेचे आहे.

Parenting Tips in marathi
सुट्टीत मुलांना ठेवा व्यस्त वाढणार नाही तुमचा ताण

३. अनेक वेळा पालक आपल्या मुलांकडून आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कठोर भूमिका घेतात. त्यांच्यावर असे नियम (Rules) लादतात, ज्यांचे पालन करणे मुलांसाठी कठीण असते. मुलांसोबत अधिक कठोर भूमिका घेतल्याने त्यांच्या हृदयावर आणि मनावर परिणाम होतो. तुमचा मुद्दा लहान शब्दात मुलांना चांगल्या प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करा.

४. अनेक वेळा असे दिसून आले आहे की पालक आपल्या मुलांना पुढे जाण्यासाठी, अन्न खाण्यासाठी, फिरायला जाण्यासाठी किंवा कोणत्याही कार्यात किंवा कार्यक्रमात भाग घेण्यास भाग पाडतात. पालकत्वाची ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. अशा परिस्थितीत मुलांच्या मनात पालकांची भीती अतिरेक होऊन त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याची भीती वाटते. अशी मुले आपले मन कोणाला सांगायलाही घाबरतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे . कृपया आपल्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्यावा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.