Parle-G ने दिला महागाईचा झटका; किंमतीत 5 ते 10 टक्क्यांची वाढ

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत आहे, त्याच दरम्यान भारतातील लोकप्रिय बिस्किट 'पार्ले जी'च्या (Parle-G) दरातही वाढ करण्यात आली आहे.
Parle-G ने दिला महागाईचा झटका; किंमतीत 5 ते 10 टक्क्यांची वाढ
Parle-G ने दिला महागाईचा झटका; किंमतीत 5 ते 10 टक्क्यांची वाढSaam Tv

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत आहे, त्याच दरम्यान भारतातील लोकप्रिय बिस्किट 'पार्ले जी'च्या (Parle-G) दरातही वाढ करण्यात आली आहे. पार्ले प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने 'पार्ले-जी', ज्याला 'आम आदमीची बिस्किटे' म्हटले जाते, च्या किमती 10 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. गेल्या मंगळवारी कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बिस्किटे बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढल्याने 'पार्ले-जी' उत्पादनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे देखील पहा-

पार्ले जी महाग;

पार्ले प्रॉडक्ट्सचे वरिष्ठ श्रेणी प्रमुख मयंक शाह यांच्या मते, पॅकेटच्या 'ग्राम'मध्ये थोडीशी कपात केली असली तरी किमती आकर्षक पातळीवर ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले आहेत. साखर, गहू आणि खाद्यतेलासारख्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने कंपनीला आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवाव्या लागल्याचे ते म्हणाले. लोकप्रिय पार्ले जी ग्लुकोज बिस्किटांच्या किमतीत ६ ते ७ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

Parle-G ने दिला महागाईचा झटका; किंमतीत 5 ते 10 टक्क्यांची वाढ
पहिली ते सातवीचे वर्ग सुरु होणार? राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

महागाईमुळे कंपन्यांवर दबाव

त्याचबरोबर कंपनीने रस्क आणि केक सेगमेंटच्या किमती 5 ते 10 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की Hide and Seek आणि Crackjack हे देखील पार्लेचे लोकप्रिय ब्रँड आहेत, त्यांच्या उत्पादनांच्या किमतीही वाढवण्यात आल्या आहेत. मयंक शाह म्हणाले की, कंपनीने 20 रुपये किंवा त्याहून अधिक किमतीची बिस्किटं आणि इतर उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. उत्पादन खर्चावरील वाढत्या महागाईचा दबाव लक्षात घेऊन कंपनीने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com