
Menstruation : मासिक पाळी हा स्त्रियांच्या शरीरातील पुनरुत्पादक बदल आहे. जो प्रत्येक महिन्याला न चुकता येतो आणि तेव्हा आपल्या इच्छेप्रमाणे कोणत्याही गोष्टी धड होत नाहीत. अशा वेळी हार्मोनल्स बदलतात त्यामुळे काही वेळेस सेक्स करण्याची भावना मनात निर्माण होते.
स्त्रियांना महिन्यातून किंवा २५ ते ३० दिवसांच्या कालावधीत मासिक पाळी (Menstruation) येते. या दर महिन्याला येणाऱ्या स्थितीत अनेकदा आपल्या शारीरिक व मानसिकतेवर परिणाम होतो. कधी कधी आपल्याला होणाऱ्या मुड स्विंग्स, इरिटेशन, पोटदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, पोटातील क्रॅम्प्स , मळमळ, उलटी, चिडचिड या समस्या होणं एकदम साधारण गोष्ट वाटते परंतु अनेक लोक त्यांच्या मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स करण्याबद्दल गोंधळलेले असतात. काहींच्या मते हे करणे सुरक्षित आहे तर काहींच्या मते असुरक्षित आहे. अनेक लोक त्यांच्या मासिक पाळीत सेक्स करणे टाळतात. जाणून घेऊया मासिक पाळीदरम्यान शरीरसंबंध ठेवण्याबाबत तज्ज्ञांचे मत काय आहे.
गायनेकोलॉजिस्टच्या अभ्यासानुसार जर आपल्या जोडीदाराला मासिक पाळीदरम्यान शरीरसंबंध ठेवण्यास आरामदायक वाटत असेल तर, त्यात कोणतेही गैर नाही. पण मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
या काळात आपल्या जोडीदाराला कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल, तर त्यासाठी जबरदस्ती करू नका. कोणत्याही प्रकारचे संसर्ग टाळण्यासाठी पुरुष जोडीदाराने या काळात सुरक्षेची (कंडोम) काळजी घेणे आवश्यक आहे. शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी आणि नंतर प्रायव्हेट पार्ट पूर्णपणे स्वच्छ करणे गरजेचे आहे.
अॅलर्जी नसेल त्यावेळी मासिक पाळीत लैंगिक क्रिया टाळण्याची गरज नाही. पीरियड्स दरम्यान शारीरिक संबंध ठेवणे काही लोकांसाठी थोडे त्रासदायक असले तरी ते सुरक्षित आहे. मासिक पाळी सुरु होते, अशा स्थितीत लैंगिक संबंध ठेवतो तेव्हा पीरियड्स क्रॅम्पस सारख्या दुखण्यावर आराम मिळतो.
मासिक पाळीत शारीरिक संबंध ठेवणे चांगले की वाईट ?
मासिक पाळीच्या दरम्यान शारीरिक संबंध ठेवणे स्त्रियांच्या आरोग्यासाठी हानिकारक की फायदेशीर ? हा प्रश्न अनेकांच्या मनात कायम आहे. काही लोक त्याबद्दल मोकळेपणाने बोलतात, तर काहींना याबद्दल बोलताना संकोच वाटतो. अनेक अभ्यासांमध्ये हे देखील मान्य करण्यात आले आहे की, महिलांना त्यांच्या मासिक पाळीत सेक्सचा जास्त आनंद होतो. तथापि, या काळात सेक्स करणे त्यांच्या आरोग्यासाठी कसे चांगले आहे याबद्दल अनेक कल्पना आहेत. या लेखात आपण मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवण्याच्या महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत.
मासिक पाळी दरम्यान शारीरिक संबंध ठेवण्याचे कनेक्शन -
मासिक पाळी ही महिलांच्या शरीरात होणारी एक प्रक्रिया आहे, जी पूर्णपणे नैसर्गिक आहे. निरोगी स्त्रीमध्ये, हे दर महिन्याला ठराविक अंतराने येते. साहजिकच ते स्त्रियांच्या प्रजनन व्यवस्थेशी संबंधित आहे. मासिक पाळी येणे हे महिलांच्या आरोग्याचे लक्षण आहे. मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवणे सुरक्षित मानले जाते. आत्तापर्यंत, कोणत्याही संशोधनातून असे दिसून आले नाही की मासिक पाळीत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर स्त्री किंवा पुरुषाला कोणत्याही प्रकारचे आजार झालेला आहे. वास्तविक, मासिक पाळीदरम्यान, बहुतेक लोकांच्या मनात रक्त बाहेर येण्याबद्दल आणि सर्व घाण होण्याची भीती असते. याच कारणांमुळे काही लोक त्यांच्या मासिक पाळीत शारीरिक संबंध ठेवण्यापासून दूर राहतात.
मासिक पाळीत शरीरसंबंध ठेवण्याचे फायदे -
१. मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना कमी होतात (Reduce Periods Pain) -
अनेक महिलांना मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना होतात. अशा स्थितीत शारीरिक संबंध ठेवल्याने या दुखण्यात आराम मिळतो. या दरम्यान शरीरात ऑक्सीटोसिन, डोपामाइन हार्मोन्स आणि एंडोर्फिनची पातळी वाढते हे या मासिक पाळी दरम्यान वेदना कमी करणारे औषध म्हणून काम करते. असे म्हटले जाते की, मासिक पाळीदरम्यान शरीर संबंध ठेवल्याने पीरियड्सच्या वेदनांपासून आराम मिळतो.
२. चिडचिड कमी होते (Reduce irritability) -
मासिक पाळी सुरू होण्याच्या काही दिवस आधी महिलांच्या स्वभावात चिडचिडेपणा येतो. अशा परिस्थितीत, शरीर संबंध ठेवल्याने शरीरातून बाहेर पडणारे एंडोर्फिन आणि ऑक्सिटोसिन मेंदूतील केंद्रे सक्रिय करतात, ज्यामुळे कामोत्तेजनाची भावना येते, ज्यामुळे तणाव दूर होतो. या काळात शरीर संबंध ठेवल्याने मूड स्विंगपासून आराम मिळतो.
३. गर्भधारणेचा धोका नाही -
सामान्य दिवसांमध्ये शरीर संबंध ठेवल्याने गर्भधारणा होण्याची शक्यता कायम राहते, परंतु मासिक पाळीदरम्यान शरीर संबंध ठेवल्याने गर्भधारणेची शक्यता खूपच कमी होते. या काळात गर्भधारणा होण्याची केवळ १५ टक्के शक्यता असते.
४. पीरियड्सचा कालावधी कमी होते (Reduce Period Time) -
शरीर संबंध ठेवल्याने मासिक पाळीचा कालावधी कमी होतो. भावनोत्कटता दरम्यान, स्नायूंचे आकुंचन होते, ज्यामुळे गर्भाशय जलद भरू लागते. यामुळेच शरीर संबंध ठेवताना पीरियड्सचा कालावधी कमी होऊ शकतो.
५. डोकेदुखीपासून आराम मिळेल -
अर्ध्याहून अधिक महिलांना मासिक पाळीदरम्यान डोकेदुखीचा (Headache) त्रास होतो. तसे, पीरियड्समध्ये होणाऱ्या मायग्रेनमध्ये महिला शरीर संबंध ठेवण्यापासून परावृत्त होतात. पण ज्या महिला पीरियड्स दरम्यान शरीर संबंध ठेवतात, त्यांची डोकेदुखी बर्याच अंशी किंवा पूर्णपणे बरी होते असे आढळून आले आहे.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.