फोनमध्ये सतत नेटवर्कची समस्या येतेय? 'या' पद्धतीने करा नेटवर्क नसतानाही Calling

आपल्याकडे फोन कोणताही असो, पण खराब नेटवर्कसारख्या समस्यांमुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. खराब नेटवर्कमुळे अनेक कामे विस्कळीत होतात.
फोनमध्ये सतत नेटवर्कची समस्या येतेय? 'या' पद्धतीने करा नेटवर्क नसतानाही Calling
How to Solve Mobile Network Issue in MarathiSaam Tv

आपल्याकडे फोन कोणताही असो, पण खराब नेटवर्कसारख्या समस्यांमुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. खराब नेटवर्कमुळे अनेक कामे विस्कळीत होतात. काही इमर्जन्सीचे काम असेल तर ते नेटवर्कमुळे अपूर्ण राहते. एवढेच नाही तर खराब नेटवर्कमुळे (Network Issue) कधी कधी महत्वाचे कॉल्स पण कट होतात. या समस्येंमुळे आपण विचार करतो की आपण आपलं नेटवर्क दुसऱ्या नेटवर्कमध्ये पोर्ट करावं.

पण तुम्हाला इतका त्रास सहन करण्याची काहीच गरज नाही, कारण अशा त्रासातून सुटका मिळवण्यासाठी तुमच्या फोनमध्येच एक खास फीचर देण्यात आले आहे. ते फीचर काय आहे आणि ते तुमच्यासाठी कसे काम करेल, चला जाणून घेऊया. (How To Solve Network Issue)

How to Solve Mobile Network Issue in Marathi
पिंपरी-चिंचवड हादरले; नातेवाइकाच्या घरी गेलेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार

लक्षात ठेवा की, हे फिचर वापरण्यासाठी तुमच्या घरात वाय-फाय (Wi-Fi) असणे आवश्यक आहे. म्हणजेच वाय-फायच्या माध्यमातून तुम्ही नेटवर्कची समस्या सहज दूर करू शकता. हे सेटिंग सुरु केल्यानंतर, तुम्ही सामान्य फोन कॉलप्रमाणे वाय-फाय कॉलिंगचा (Wi-Fi Calling) लाभ घेऊ शकणार आहात.

हे देखील पाहा-

प्रत्येक Android आणि iPhone मध्ये Wi-Fi Calling फिचर असते. याद्वारे तुम्ही ही समस्या सोडवू शकता.

-जर तुम्ही आयफोन वापरकर्ते (iPhone User) असाल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल.

-त्यानंतर फोनच्या Data सेक्शनवर क्लिक करा.

-तेव्हा तुम्हाला Wi-Fi Calling चा ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करा.

-पण हे ऑप्शन तुम्हाला तेव्हाच दिसेल जेव्हा तुमच्या मोबाईल मध्ये Wi-Fi Calling सपोर्ट असेल.

-आता तुम्हाला 'Wi-Fi Calling on This iPhone' एनेबल करावं लागेल. अश्या प्रकारे तुमची नेटवर्कच्या समस्या दूर होईल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.