Physical Relationship Tips : 'या' पदार्थाचे अतिसेवन करत नाहीत ना ? होऊ शकतो लैगिंक संबंधावर दुष्परिणाम !

या पांढऱ्या पदार्थाचा आपल्या शरीर संबंधावर परिणाम कसा होतो जाणून घ्या
Physical Relationship Tips
Physical Relationship Tips Saam TV

Physical Relationship Tips : आजकाल प्रत्येक पिढी आनंदी राहण्याचे नवनवीन मार्ग शोधत असते. कामाच्या व्यापातून किंवा खाण्यापिण्याच्या चुकीच्या शैलीतून आपण आपल्या आरोग्याकडे अधिक दुर्लक्ष करतो.

आपल्या सतत सांगितले जाते की, पांढऱ्या पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात करायला हवे. परंतु, आजकाल सर्वानुमते साखरेला आरोग्याचा नंबर एकचा शत्रू मानले जाते आहे. साखरेचे अतिरिक्त प्रमाण वाईट आहे, त्यामुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. त्याचबरोबर शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते. परिणामी शरीर (Health) संबंधांची इच्छा कमी होते. जाणून घ्या, साखरेच्या अतिरिक्त प्रमाणाचे लैंगिक जीवनावर कसे परिणाम होतात.

कमी टेस्टोस्टेरॉन -

Physical Relationship Tips
Relationship Tips : पार्टनरसोबत भांडण झालंय? 'या' पध्दतीने संबंध बनवा,निवळेल राग

साखरेच्या (Sugar) अतिरिक्त प्रमाणामुळे शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते. टेस्टोस्टेरॉन हे शरीर संबंध करण्यासाठी आपल्या हार्मोन्सला उतेजित करतात. क्लिनिकल एंडोक्राइनोलॉजीच्या अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे की, साखरेमुळे टेस्टोस्टेरॉन पातळी कमी होते.

लैंगिक आरोग्यावर परिणाम होतो -

लेप्टिन हे हार्मोन शरीर संबंधाची होणारी इच्छा नियंत्रित करते म्हणून जर तुम्ही अतिरिक्त साखर खात असाल तर लेप्टिन निर्मितीस प्रतिकार होतो आणि शरीरातील टेस्टोस्टेरॉन पातळी कमी होते. त्याचा लैंगिक आरोग्यावर परिणाम होतो, असे जर्नल क्लिनिकल एंडोक्राइनोलॉजीच्या अभ्यासातून दिसून आले आहे.

Physical Relationship Tips
Relationship Tips : तुमच्या जोडीदाराच्या वागण्यात 'हे' बदल दिसताय, तर होतेय तुमच्या सोबत फसवणूक !

इन्सुलिन प्रतिकार -

पिट्युटरी ग्रंथीतून ग्रोथ हार्मोन स्त्रवते. त्यामुळे शरीर संबंध ठेवण्याची इच्छा होण्यास मदत होते. साखरेच्या अतिरिक्त प्रमाणामुळे स्थूलता वाढते. तसेच त्यामुळे इन्सुलिन रेसिस्टन्स होऊन लैगिंक क्षमतेची इच्छा कमी होते.

लैगिंग संबंधाची इच्छा कमी होणे-

Physical Relationship Tips
Relationship Tips : भांडणामुळे जोडीदाराशी संवाद घडत नाही तर, 'या' उपायांनी नात्यात येईल पुन्हा गोडवा !

आहारातील साखरेच्या अधिक प्रमाणामुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण बदलते. तसेच त्यामुळे भूक लागते, थकवा जाणवतो. त्याचबरोबर अतिरिक्त साखरेच्या प्रमाणामुळे ओरेक्सिनची पातळी कमी होते. त्यामुळे थकवा येतो आणि त्याचा लैगिंग संबंधावर परिणाम होतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com